शिल्लॉंगचे आर्चबिशप रेव्ह. डॉमिनिक जाला यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याविषयी सर्वांना ज्ञात केले. “समाजाची निस्वार्थीपणे केलेली सेवा आणि मेघालयाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान नेहेमीच प्रत्येकाच्या लक्षात राहील” असे म्हणत आर्चबिशप रेव्ह. डॉमिनिक जाला यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी केली.
Anguished by the passing away of Most Rev. Dominic Jala, the Archbishop of Shillong. He will be remembered for his impeccable service to society and passion towards Meghalaya’s progress. May his soul rest in peace: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 12, 2019
११ ऑक्टोबर २०१९ रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे कार अपघातात शिल्लॉंगचे आर्चबिशप रेव्ह डॉमिनिक जाला यांचे निधन झाले.
१९ नोव्हेंबर १९७७ साली सालेशिअन्स ऑफ डॉन बॉस्को येथे फादर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गुवाहाटी प्रांताचे मुख्य म्हणून देखील त्यांनी जबाबदारी पहिली. नंतर डिसेम्बर १९९९ साली त्यांची शिलॉंगचे मुख्य आर्चबिशप म्हणून नेमणूक करण्यात आली.