रामदास कदमांना धमकी; क्लिप वायरल

    08-Jan-2019
Total Views | 25
 
 

नवी दिल्ली : खासदार संभाजी राजे यांचे सचिव योगेश केदार आणि राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यात फोनवर जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. केदार आणि कदम यांच्या संभाषणाची आॅडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत असून यात केदार याने कदम यांना धमकी दिली आहे. याबाबत संभाजी राजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून आपल्या अपरोक्ष केदार याने रामदास कदम यांना फोन केल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले.

 

कदम-केदार वादाचं नेमकं कारण काय?

 

नुकत्याच भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला संभाजी राजेदेखील उपस्थित होते. यावेळी राजेंनी मराठा आरक्षण मिळवून देण्यात नारायण राणे यांचे मोठे योगदान असल्याचे विधान केले होते. यावर रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत, संभाजी राजेंनी कोणाचीही लाचारी पत्करू नये असा टोला लगावला होता. यावरून संभाजी राजे यांचा सचिव केदार याने फोनवरून रामदास कदम यांना धमकावत अर्वाच्च भाषा वापरली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121