८ वर्षाच्या चिमुरडीने राहुल गांधींना समजावला राफेलचा करार

    12-Jan-2019
Total Views | 25

 

 
 
 
 
 
नवी दिल्ली : देशात राफेलचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. राफेल कराराबद्दल चक्क एका ८ वर्षांच्या चिमुरडीने राहुल गांधी यांना समजावले आहे. या ८ वर्षांच्या मुलीने एका व्हिडिओद्वारे राहुल गांधी यांना समजविण्याचा प्रयत्न केला. राफेल विमानाचा फरक या मुलीने आपल्या शालेय कंपासबॉक्सच्या साहाय्याने समजविला.
 

मी राफेलचा मुद्दा अत्यंत सोप्या पद्धतीने समजावू इच्छिते. हे राहुल गांधी यांचे राफेल विमान आहे. जे आतून संपूर्णपणे रिकामी आहे. याची किंमत ७२० कोटी रुपये आहे आणि हे मोदीजींचे विमान आहे, जे आतून संपूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रांनी भरलेले आहे. याची किंमत १६०० कोटी रुपये आहे. राहुल गांधींना एवढीशी गोष्ट समजत नाही, की ७२० कोटी ही राफेल विमानाची बेसिक किंमत आहे, आणि १६०० कोटी रुपये ही शस्त्रांनी युक्त असलेल्या राफेल विमानाची किंमत आहे.

 
 
 

राफेलचा हा मुद्दा समजावताना या चिमुरडीने दोन कंपासबॉक्स वापरले त्यापैकी एक रिकामी होता. तर दुसरा पेन्सिलींनी भरलेला होता. या चिमुरडीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला. तसेच निर्मला सीतारमण यांनी या मुलीचे याबाबत कौतुकही केले. त्यामुळे सध्या या व्हिडिओची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद! मी या लहान मुलीचे विशेष आभार मानते. तिने राफेल विमान प्रकरणात आपली रुची दाखविली. माझ्या शुभेच्छा आहेत की ती एका लढाऊ विमानाची प्रशिक्षित वैमानिक बनावी. या शब्दांत निर्मला सीतारमण यांनी या चिमुरडीचे कौतुक केले. जी गोष्ट एका ८ वर्षाच्या मुलीला कळते. ती राहुल गांधींना कळत नसल्यामुळे या लहान मुलीला हा राफेलचा मुद्दा राहुल गांधींना समजावून सांगावा लागला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121