प्रसिद्ध खगोल वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2018
Total Views |



कॅम्ब्रिज :
प्रसिद्ध ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे आज निधन झाले आहे. ते ७६ वर्षांचे होते. आज सकाळी त्यांच्या परिवाराकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली असून हॉकिंग यांच्या अचानक जाण्यामुळे जगभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसrली आहे. 

इंग्लंडमधील कॅम्ब्रिज येथील त्यांच्या राहत्या घरी आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर हॉकिंग यांचे कुटुंबीय ल्युसी हॉकिंग, रॉबर्ट हॉकिंग आणि टीम हॉकिंग यांनी आज सकाळी हॉकिंग यांच्या निधनाविषयी माहिती दिली. आपल्या पित्याचे अचानकपणे जाणे हे सर्वांसाठी अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी केले कार्य हे जगाला नेहमी प्रेरणा देत राहील असे म्हणत हॉकिंग यांच्या जाण्यावर त्यांनी दु:ख व्यक्त केले.

हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ मध्ये इंग्लंडमध्ये झाला होता. लहानपणापासून ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी 'बिंग बँग थेअरी' या विषयामध्ये वयाच्या २१ व्या वर्षी पी.एचडी घेतली होती. यानंतर त्यांना मोटर न्यूरोनच आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यावेळी ते फक्त २ वर्ष जिवंत राहतील, असे भाकीत डॉक्टरांनी केले होते. यानंतर काही वर्षांनी त्यांचे शरीराचे अनेक भागांचे चलनवलन बंद पडले होते. परंतु असा स्थिती देखील त्यांनी अनेक नवनवीन संशोधने केली. ब्लॅक होल याविषयी सखोल संशोधन करून या सामन्य नागरिकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. यावर त्यांनी अनेक पुस्तके देखिल लिहिली होती.

 
 
हॉकिंग यांच्या जाण्यावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांनी केले संशोधन हे अत्यंत अमुल्य असून त्यांच्या या कार्यासाठी जग त्यांचे कायम स्मरण करेल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांकडून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे भारतीय नेत्यांनी देखील हॉकिंग यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे.



 
@@AUTHORINFO_V1@@