(Chandrasekhar Bawankule) "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती लहान थोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. ही प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ हा उत्तम आणि महत्वाकांक्षी उपक्रम आहे", असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
Read More
Chandrasekhar Bawankule राज्यातील महसूल यंत्रणा लोकाभिमुख करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट परिपत्रक जारी करून जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी दोनवेळा आपल्या क्षेत्रात दौरा करून आपल्या विभागातील शासकीय ध्येयधोरणे व योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही याचा वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा असे म्हटले आहे. या कामात कोणी कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई विनाविलंब केली जाईल असेही बजावण्यात आले आहेत.
उबाठा गटाचे पुण्यातील नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबातची माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तोंडावर उबाठा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
(Chandrasekhar Bawankule) भाजप-महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदाबाबत कोणताही तिढा नसून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे परदेशात गेले होते, त्यामुळे चर्चा झाली नाही. पालकमंत्रीपदासंदर्भात फारतर दोन दिवसांत निर्णय होईल, असा विश्वास महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. त्यांनी दि. ६ जानेवारीला सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सद्यस्थिती माध्यमांसमोर सांगितली.
जम्मू काश्मीरमधील पूंछ येथे कर्तव्यावर असताना एका रस्ते अपघातात राज्यातील दोन जवानांचा मृत्यू झाला. या दोन्ही जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून १ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही जवानांना श्रद्धांजली वाहिली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या ६ आमदारांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत निवडून आल्याने त्यांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणूकीतील दणदणीत विजयानंतर अखेर महायूती सरकारच्या अधिकृत शपथविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत शपथविधीच्या तारखेची घोषणा केली.
नागपूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला. कामठीचे मतदार विजयी करणार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे ( Mahayuti ) सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूर : “काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला असून ते खोटे बोलतात, हे लोकांना कळले आहे. त्यामुळे जनतेचा महायुतीवर विश्वास आहे,” असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी सांगितले. त्यांनी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी कामठी येथे माध्यमांशी संवाद साधला.
नागपूर : महाराष्ट्रात महायुती १६५ जागांवर विजयी होणार असून महाराष्ट्रात मजबूत सरकार येईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा-महायुतीचा जाहीरनामा मान्य केला असून कॉंग्रेसचा जाहीरनामा धुळखात पडला आहे, तो कुणीही मान्य करीत नाही. कॉंग्रेसचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असेही ते म्हणाले.
नागपूर : भाजपा-महायुतीला दिलेल्या एका मतामुळे राज्यात महायुतीचे सरकार येईल.. आपलाच मुख्यमंत्री, आपलाच पालकमंत्री, आपलाच उमेदवार विजयी होणार आहे. भाजपाला मिळणारे एक मत महाराष्ट्र येथील १४ कोटी जनतेचा विकास साधणारे असेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी केले.
नागपूर : पोलिओग्रस्त प्रणयाच्या शस्त्रक्रियेसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी मदत केल्याने दोन्ही पायांनी अपंग असणारा प्रणय आता चालू लागला आहे. त्याच्या पायाला बळ मिळाले आहे. तो भविष्यात रोजगारक्षम व्हावा यासाठी सर्वोतोपरी मदत देण्याचे वचनही श्री बावनकुळे यांनी गादा गावात भेटी दरम्यान दिले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गडेकर कुटुंबीयांसाठी चंद्रशेखर बावनकुळे हे देवदुताप्रमाणे ठरले.
मुंबई : “काँग्रेससह महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. मतांसाठी काँग्रेस खोटारडेपणा करीत आहे,” असे टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी केली.
उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. गुरुवारी उबाठा गटाकडून आपल्या पक्षाचा वचननामा प्रकाशिक करण्यात आला. यावरुन बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. तसेच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियूक्ती करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी मुळातच अनैसर्गिक असल्याने असल्याने विदर्भातील जागावाटपावरून सुरू असलेल्या वादात उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस लोटांगण घालायला लावत असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी 'भाजपा-शिवसेना युतीमध्ये आम्ही मातोश्रीलाच मान द्यायचो.!!' असे आवर्जून नमूद केले.
"हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक यश मिळवले असून हरियाणातील विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार,महायुतीचा प्रचंड विजय होणार,"असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार दि.८ रोजी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार करणारा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत उघडा पडला, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोराडी तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन पार पडले. कोराडी तालुका क्रीडा संकुल हे जिल्हा क्रीडा संकुलाच्या बरोबरीचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर मान्यवर उपस्थित होते.
भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी अनुप मोरे यांची नियूक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी रविवारी त्यांची नियूक्ती केली. तसेच राहुल लोणीकर यांना महाराष्ट्र प्रदेश सचिवदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
९ ते ११ ऑगस्ट दरम्यान भाजपा संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य ढवळून काढणार असल्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. संवाद यात्रेदरम्यान राज्यातील मंडल स्तरावरील ७५० ठिकाणी भाजपाचे अधिवेशन होईल व राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्यातून त्यांनी मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि तुमची काय क्षमता आहे, असाही प्रश्न त्यांनी विचारला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राज्यस्तरीय संवाद यांत्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार आहे. येत्या दि. २१ जुलै रोजी पुण्यात राज्यातील पाच हजार भाजप पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असून, त्यात केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेची रूपरेषा, तसेच तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार, दि. १५ जुलै रोजी दिली.
उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच आहे. हिंमत असेल तर माझ्या पाच प्रश्नांची उत्तरं द्या, असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना दिले आहे. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची सामना वृत्तपत्रासाठी मुलाखत घेतली होती. त्यानंतर बावनकुळेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला.
महायुतीमध्ये आणखी एका मित्रपक्षाची भाजपला साथ मिळाली आहे. लोकनेते स्व. विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जय शिवसंग्राम संघटनेचा भाजपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले. दरम्यान, त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नाशिक येथे भेट घेतली.
औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंना दिले आहे. ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेवरुन बावनकुळेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकांउंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.
उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागत आहेत, त्यांची मानसिक स्थिती ढासळत आहे. त्यांना लवकरच हॉस्पिटलमधे घेऊन जायची गरज आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी पाहिली तर पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याला नापसंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर ते प्रतिक्रिया देत होते.
राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. त्यामुळे पवारांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बावनकुळे म्हणाले की, एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. त्यामुळे शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. भंडारा शहराजवळील भिलवाडा गावाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी हा अपघात की, घातपात असा सवाल उपस्थित करत आरोप केला आहे.
उद्धव ठाकरे, ४ जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचं आवडतं काम करावं लागेल, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला.
"उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे", असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. २२ मार्च रोजी केला.नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंचे साथीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात. महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही.
काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असताना पद्माकर वळवींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्याची ही मुंबई आहे. काहींनी गेली 25 वर्ष मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले. मात्र गेल्या 10 वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही. त्याला याच ठिकाणी हक्काचे घर मिळण्यासाठी जे काय करावे लागेल ते आम्ही करू. मला धन्यवाद नको तुमचा आशीर्वाद हवा आहे," असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना केले.शहिद भगतसिंग मैदानावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण
ॲड. समृद्ध ताडमारे यांची भाजपा प्रदेश लीगल सेल उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ॲड. समृद्ध ताडमारे हे दुसऱ्या पिढीचे वकील असून त्यांचे वडीलसुध्दा संघ परिवाराशी जुळलेले आहेत.
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील दिलेल्या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होईल. मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असे, असे सांगून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला ,"ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही!
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पक्षाची विकासाची दृष्टी गरीबांच्या कल्याणाकडे घेऊन आणि सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या निर्देशानुसार “गाव चलो अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत देशभरातील ७ लाख बूथवर कार्यकर्ते २४ तास कार्यरत राहणार आहेत. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही २४ तास एका गावात राहणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सनातन हिंदू धर्माबद्दलची त्यांचे मत तुम्हाला मान्य आहेत का? हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे.
उद्धव ठाकरेंनी कितीही हिंदुत्वाच्या बाता मारल्या तरी ते काँग्रेसच्या आणि इटालियन शक्तीच्या पायावर लोटांगण घेत आहेत, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजपकडून पुण्यात हर मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. रविवारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील रोकडोबा मंदिरात स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय-२०२४’ अंतर्गत चार दिवसांच्या मुंबई लोकसभा मतदारसंघ प्रवासाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार, दि. ०५ जानेवारी २०२४ रोजी ते उत्तर मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा आणि दक्षिण मुंबई लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील एकूण नऊ विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने कंबर कसली असून, तीन लोकसभा मतदारसंघांसाठी एक नेता, असे प्रचारतंत्र ठरविण्यात आले आहे. त्याआधी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील प्रत्येक लोकसभेच्या तीन विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात २ डिसेंबरपासून मुंबईतून करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांना तडे दिले, यामुळे तर पंतप्रधान मोदी हेच सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात हा विश्वास असल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपासोबत आले आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. दोन्ही नेते विचार व विकासासाठी एकत्र आले आहेत.
कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी शनिवार, १६ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विरोधकांच्या इंडी आघाडीत काँग्रेससह सामील असणारे उद्धव ठाकरे आणखी किती वेळा गप्प बसणार. त्यांना स्वातंत्र्यवीराचा वारंवार होणारा अपमान मान्य आहे का? असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी केलेल्या सावरकरांच्या अवमानाच्या विरोधात नागपूर येथे भाजपातर्फे झालेल्या आंदोलनावेळी बावनकुळे माध्यमांशी संवाद साधत होते.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात महाराष्ट्र भाजपच्या वतीने दि. ८ डिसेंबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. भाजपचे सर्व कार्यकर्ते उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून काढण्याच्या वक्तव्यावरून आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मोहित कम्बोज यांनी खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्यानंतर राऊतांनी २७ फोटो अन् ३ व्हिडीओ असल्याचा दावा केला होता. यावर आता कम्बोज यांनी राऊतांना खुलं आवाहन दिलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की? असा सवाल भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून विचारण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. ज्यात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झुम करुन पहा…ते तेच आहेत ना? असा प्रश्न उपस्थित करत पिक्चर अभी बाकी है… असे राऊतांनी म्हटले होते.
संजय राऊत यांच्या ‘स्वप्ना’तल्या गोष्टी आम्ही बोलायला चालू केलं, तर राऊतांच स्वप्न भंग होईल. राऊतांनी बावनकुळेंबद्दल अपप्रचार करण्यापेक्षा नको ते उद्योग करणाऱ्या स्वतःच्या मालकाबद्दल बोलावं. अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी खासदार संजय राऊतांवर केली आहे. राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्यास आता भाजपकडुन प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे.
काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंनाही रामनामाची ॲलर्जी झाली आहे. त्यामुळेच रामनामाचा गजर केला की त्यांना त्रास होतो, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना गुरुवारी ट्विटरद्वारे दिले. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 'काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. निवडणुकीसाठी आचारसंहिता असते. काही शंकाकुशंकाबाबत खुलासा व्हावा, यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
भाजपकडून अयोध्येसाठी ३६ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. श्री रामजन्मभूमी अयोध्येत निर्माणाधीन दिव्य मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचवेळी राज्यातील जनतेला अभिषेक झाल्यानंतर रामलल्लाचे दर्शन घेता यावे यासाठी महाराष्ट्र भाजप ‘चलो अयोध्या अभियान’ राबवणार आहे. त्यासाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.
महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह असणाऱ्या तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी सुरेश कुटे यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. खाद्यतेल , दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल , वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो. 'द कुटे ग्रुप'मुळे बीड जिल्ह्याला नवीन ओळख मिळाली आहे.