महायुतीच्या ६ आमदारांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द!

    05-Dec-2024
Total Views | 658
 
Mahayuti
 
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या ६ आमदारांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत निवडून आल्याने त्यांचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती आहे.
 
नियमानुसार, एका व्यक्तीला एकाचवेळी दोन सभागृहांच्या सदस्यपदी राहता येत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत निवडून आलेल्या सहा आमदारांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर या आमदारांचा समावेश आहे.
 
हे वाचलंत का? -  ठरलं तर मग! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
 
कोण कुठल्या मतदारसंघातून निवडून आले?
 
चंद्रशेखर बावनकुळे - कामठी
प्रवीण दटके - नागपूर मध्य
आमश्या पाडवी - अक्कलकुवा
राजेश विटेकर - पाथरी
रमेश कराड - लातूर ग्रामीण
गोपीचंद पडळकर - जत
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121