महायुतीमध्ये आणखी एका मित्रपक्षाची भाजपला साथ!

    01-May-2024
Total Views | 366

Mahayuti 
 
नाशिक : महायुतीमध्ये आणखी एका मित्रपक्षाची भाजपला साथ मिळाली आहे. लोकनेते स्व. विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जय शिवसंग्राम संघटनेचा भाजपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले. दरम्यान, त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नाशिक येथे भेट घेतली.
 
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिल्यामुळे रामहरी मेटे भाजपसोबत आले असल्याचे सांगण्यात येत आहे. जय शिवसंग्रामने यासंबंधी एक पत्रही जारी केले. यात भाजप महायुतीने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासह अनेक समाजहिताचे निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. तसेच स्व. विनायकराव मेटे हे अखेरपर्यंत युतीधर्म पाळत भाजपासोबत एकनिष्ठ राहिले. जय शिवसंग्राम संघटना स्व. विनायकराव मेटे आणि मराठा भूषण अण्णासाहेब पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन हे कार्य पुढे चालवत आहे, असे म्हणत महायूतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
 
हे वाचलंत का? -  ठाणे आणि कल्याणमध्ये महायूतीचे उमेदवार जाहीर!
 
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंनी शिवसंग्रामचे महायूतीमध्ये स्वागत करत त्यांचे आभार व्यक्त केले. याशिवाय भाजप आणि जय शिवसंग्राम यांच्यातील समन्वयासाठी आमदार श्रीकांत भारतीय व अमित जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अभिजीतला

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121