उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो! बावनकुळेंचा घणाघात

    07-Nov-2024
Total Views |

Thackeray


मुंबई :
उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. गुरुवारी उबाठा गटाकडून आपल्या पक्षाचा वचननामा प्रकाशिक करण्यात आला. यावरुन बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.
 
 
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला. अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही."
 
हे वाचलंत का? -  ऑल इंडिया उलमा बोर्डाचं काँग्रेसला पत्र! निवडणूकीत पाठिंबा देण्यासाठी केल्या १७ मागण्या
 
डोळ्यासमोर फक्त कुटुंबच!
 
"हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं. पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो," अशी खोचक टीकाही चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे.