ग्रीस, सायप्रस आणि आर्मेनिया या देशांना क्षेपणास्त्रे पुरवण्याचा निर्णय घेऊन पाकसमर्थक तुर्कस्तानला भारताने अप्रत्यक्ष इशारा दिला. तुर्कस्तानशी ताणलेले संबंध असलेल्या या तिन्ही देशांना थेट क्षेपणास्त्र पुरवठ्याचा निर्णय घेत, तुम्ही आमच्या शत्रूंची साथ द्याल, तर भारतही चोख प्रत्युत्तर देईल, ही मोदी सरकारची कूटनीती तुर्कीच्या चिंतेत भर घालणारी ठरावी.
Read More
सागरी परिसंस्थेतील सफाई कर्मचारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारी समुद्री कासवे ही भूतलावर हजारो वर्षांपासून अस्तित्त्वात आहेत. हिंदू पुराणांमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. मात्र, वेगाने कमी होत नष्ट होण्याच्या मार्गावर असणार्या या कासवांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य पुढाकार घेत आहे. आजच्या ‘जागतिक समुद्री कासव दिना’च्या निमित्ताने राज्यातील कासव संवर्धनाच्या कामाचा घेतलेला हा सर्वंकष आढावा...
यंदा समुद्री कासवांच्या पिल्लांबाबत कोकण किनारपट्टी लखपती झाली. कारण, समुद्री कासव विणीच्या २०२४-२५ या यंदाच्या हंगामात कोकणातून तब्बल १ लाख ७१ हजार २४५ पिल्लं समुद्रात सोडण्यात आली (sea turtle hatchlings released from Konkan coast). रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापैकी यंदा सर्वाधिक पिल्लं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सोडण्यात आली, तर कासवाची सर्वाधिक घरटी रत्नागिरीच्या जिल्ह्यातील गुहागरच्या किनाऱ्यावर आढळून आली. (sea turtle hatchlings released from Konkan coast)
स्वयंपुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, असा शब्द भाजपा विधानपरिषद गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी रहिवाशांना दिला. रुपेश फाऊंडेशन आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरी येथे आयोजित केलेल्या ‘स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन’ शिबिरात दरेकर मार्गदर्शन करीत होते.
पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या आणि त्यांना संरक्षण देणार्यांच्या नांग्या ठेचल्या. मात्र, पाकिस्तान कितीही बेटकुळ्या फुगवून दाखवत असला, तरीही त्याची खरी शक्ती ही चीनचा पाठींबा हीच.परिणामी पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी, चीन नावाच्या रोगाचा उपचार आवश्यक ठरतो. चीनी पोपटाचा जीव व्यापारात अडकल्याने, त्यावरच घाव घालणे क्रमप्राप्त ठरते. पाकिस्तानसहित तुर्कस्तान आणि चीनला नामोहरम करण्यासाठी अर्थिक बहिष्कार कसा उपयोगी ठरेल याचा घेतलेला आढावा...
China, Turkey, Azerbaijan stood behind Pakistan even provided military assistance to Pakistan पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला. तरीही चीन, तुर्कीए, अजरबैजानसारखे काही देश पाकिस्तानच्या मागे उभे राहिले. त्यांनी पाकला लष्करी मदतही केली. त्यामुळे साहजिकच या देशांविरोधात भारतातही संतापाची लाट उसळली असून, या देशांशी व्यापार-पर्यटनावरील बंदीची मागणी तीव्र झाली आहे.
annual turnover of Khadi Gramodyog Bhavan in Delhi reached 110 crores भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात खादीचा वापर एक महत्त्वपूर्ण ठरला होता. स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांच्या वर्चस्वाला विरोध करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून खादीचा वापर झाला. स्वातंत्र्यानंतर, खादीचे महत्त्व दुर्लक्षित झाले. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खादी व ग्रामोद्योग आयोगाने एक ऐतिहासिक प्रगती साधली आहे. भारताच्या अर्थव्यवस्था वेगाने बदलत असताना, खादी व ग्रामोद्योग क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. पंतप्रधान मोदींच्या
रत्नागिरीच्या गुहागर किनाऱ्यावर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 'फ्लिपर टॅगिंग' केलेल्या कासवाच्या माद्या महिन्याभरातच दुसऱ्या विणीसाठी गुहागर किनारी परतल्याची नोंद 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागा'ने केली आहे (guhagar flipper tagged turtle). एकूण तीन मादी कासवांनी गुहागरच्या किनाऱ्यावर येऊन दुसऱ्यांदा अंडी घातल्याची नोंद करण्यात आली आहे (guhagar flipper tagged turtle). यामुळे कासव विणीच्या एकाच हंगामात 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा वीण करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (guhagar fli
एकीकडे शेजारी नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदूराष्ट्र स्थापनेसाठी जनता रस्त्यावर उतरलेली असताना, दुसरीकडे तुर्कीयेमध्येही इस्तंबूलचे महापौर आणि विरोधी पक्षाचे नेते एकरेम इमामोग्लू यांना भ्रष्टाचार आणि कुर्दिश दहशतवाद्यांना मदतीच्या आरोपांवरुन एर्दोगान सरकारने तुरुंगात डामले. त्याविरोधात तुर्कीयेवासीयांनी एर्दोगान सरकारला धारेवर धरले असून, तिथेही आंदोलनाचा भडका उडाला आहे.
तुर्कस्तानच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडणार्या घडामोडींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. इस्तंबूलचे महापौर एकरेम इमामोग्लू यांना तुर्कीच्या सरकारने अटक केली. या घटनेमुळे तुर्कस्तानच्या अंतर्गत सत्तासंघर्षाचे स्वरूप आणि राष्ट्राध्यक्ष रसीप तैय्यब एर्दोगान यांची राजकीय दिशा, याबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. इमामोग्लू यांना सरकारी निधीच्या कथित गैरवापराच्या आरोपावरून अटक करण्यात आली. इस्तंबूल महानगरपालिकेच्या काही विकासकामांमध्ये नियमभंग आणि अपारदर्शकता आढळून आल्याचा, तप
मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर समुद्री कासवाच्या मादीने पुन्हा एकदा अंडी घालण्याचा प्रयत्न केला. रविवार दि. १६ मार्चच्या मध्यरात्री मादी कासव किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आली होती (juhu beach sea turtle). मात्र, मानवी वावरामुळे ती पुन्हा समुद्रात परतली (juhu beach sea turtle). या महिन्यात मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर अशा पद्धतीने मादी कासव अंडी घालण्याचा प्रयत्न करत असल्याची ही तिसरी घटना आहे (juhu beach sea turtle). मात्र, या तिन्ही घटनांमध्ये मानवी वावरामुळे मादी कासव अंडी घालू शकली नाही. याबाबत वन विभागाने ता
दापोली तालुक्यातील लाडघरच्या समुद्रात जाळ्यात अडकलेल्या चार समुद्री कासवांना स्थानिक गावकऱ्यांनी मंगळवार दि. ११ मार्च रोजी जीवदान दिले (entangled sea turtle). ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या कासवांची सुटका करुन त्यांना पुन्हा समुद्रात सोडले (entangled sea turtle). कोकण किनारपट्टीवर सध्या समुद्री कासवांचा विणीचा हंगाम सुरू असल्याने गावकऱ्यांनी केलेले हे बचाव कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. (entangled sea turtle)
ओडिशाच्या किनार्यावरील अंडी घालतेवेळी टॅग केलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ समुद्री कासवाने गुहागराच्या किनार्यावर येऊन अंडी घातल्याची नोंद वनविभागाच्या कांदळवन कक्षाने केली आहे (tagged sea turtle lay eggs). या कासवाला लावलेल्या ’फ्लिपर टॅग’मुळे ही माहिती समोर आली आहे (tagged sea turtle lay eggs). महत्त्वाचे म्हणजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर अंडी घालणारे मादी कासव देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आल्याची ही इतिहासातील पहिलीच नोंद आहे. (tagged sea turtle lay eggs)
मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर समुद्री कासवाच्या मादीने मंगळवार दि. ४ मार्च रोजी अंडी घालण्याचा प्रयत्न केला (sea turtle juhu beach). मात्र, किनाऱ्यावरील माणसांचा वावर पाहून अंडी न घालताच ती समुद्रात निघून गेली (sea turtle juhu beach). मुंबईसारख्या किनाऱ्यावर समुद्री कासवाने अंडी घालण्याचा केलेला हा प्रयत्न अधोरेखित करण्यासारखा आहे. (sea turtle juhu beach)
पाकिस्तान हा जगात एकटा पडलेला देश. हा देश सध्या अक्षरश: भीक मागूनच दिवस काढतो आहे. त्याच्या वक्तव्यांची दखल घेण्याचे भारताला काहीच कारण नाही. पण, आपली बाजू जागतिक मंचावर स्पष्ट होणे गरजेचे. म्हणूनच पाकिस्तानला आधी आपल्या जनतेला दोनवेळचे अन्न पुरवा, मग जगाची उठाठेव करा, असा सल्ला भारताला द्यावा लागला.
रत्नागिरीतील समुद्री कासव विणींच्या किनार्यांमध्ये यंदा नव्या किनार्यांची भर पडली आहे (konkan sea turtle). जिल्ह्यातील चार किनार्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली असून तीन किनार्यांवर स्वतंत्रपणे कासव संरक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे (konkan sea turtle). त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कासवांची विण होणार्या किनार्यांची संख्या १६ वरून २३ झाली आहे. (konkan sea turtle)
'भारतीय वन्यजीव संस्थान' (डब्लूआयआय) आणि 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण' विभागाच्या माध्यमातून कोकणात सुरू असलेल्या सागरी कासवांच्या 'फ्लिपर टॅगिंग' प्रकल्पाअतंर्गत सिंधुदुर्गात चार कासवांना फ्लिपर टॅग लावण्यात आले आहेत (kokan sea turtle). ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान वेंगुर्ला किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या चार कासवांना 'फ्लिपर टॅग' लावण्यात आले असून आजवर ३८ कासवांचे 'फ्लिपर टॅगिंग' करण्यात आले आहे. (kokan sea turtle)
'भारतीय वन्यजीव संस्थान' (डब्लूआयआय) आणि 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण' विभागाच्या माध्यमातून कोकणात सुरू असलेल्या सागरी कासवांच्या 'फ्लिपर टॅगिंग' प्रकल्पाअतंर्गत ३२ कासवांना टॅग लावण्यात आले आहेत (kokan sea turtle). गुहागर आणि आंजर्ले किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी कासवांना हे टॅग लावण्यात आले आहेत (kokan sea turtle). यामुळे कोकणात अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची दीर्घकालीन नोंद ठेवण्यास मदत मिळणार आहे. (kokan sea turtle)
'भारतीय वन्यजीव संस्थान' (डब्लूआयआय) आणि 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण' विभागाच्या माध्यमातून कोकणात सागरी कासवांच्या 'फ्लिपर टॅगिंग' प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे (sea turtle flipper tagging). गुरुवारी दि. ३० जानेवारी रोजी मध्यरात्री गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या चार मादी कासवांना 'फ्लिपर टॅग' लावण्यात आले (sea turtle flipper tagging). यामुळे कोकणात अंडी घालण्यासाठी येणाऱ्या कासवांची दीर्घकालीन नोंद ठेवण्यास मदत मिळणार आहे. (sea turtle flipper tagging)
महाराष्ट्रातील यंदाच्या समुद्री कासव विणीच्या हंगामातील पहिले पिल्ले शनिवार दि. ४ जानेवारी रोजी रत्नागिरीतील गुहागरच्या किनाऱ्यावरुन समुद्रात रवाना झाली (guhagar beach).यंदाच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामातील कोकण किनारपट्टीवरील पहिले घरटे गुहागरमध्ये नोव्हेंबरमध्ये सापडले होते (guhagar beach). त्यामधून बाहेर पडलेल्या काही पिल्लांना शनिवारी समुद्रात सोडण्यात आले. (guhagar beach)
कोकणात यंदाच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात सुमारे ५०० कासवांचे ‘फ्लिपर टॅगिंग’ करण्यात येणार आहे (flipper tagging). ‘भारतीय वन्यजीव संस्थान’कडून (डब्लूआयआय) संपूर्ण भारतभरात राबविण्यात येणार्या सागरी कासव गणनेच्या प्रकल्पाअंतर्गत हे काम केले जाणार आहे (flipper tagging). यामुळे कोकणात अंडी घालण्यासाठी येणार्या कासवांची दीर्घकालीन नोंद ठेवण्यामध्ये मदत मिळणार आहे. (flipper tagging)
(Maharashtra) महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६४.५८% मतदान नोंदवण्यात आले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या मतदानामुळे हा आकडा वाढला असून सुधारित आकडेवारीनुसार राज्यात एकूण ६५.११% मतदान झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी पाहता ६६ टक्क्यांचा आकडा ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांच्या विणीचा हंगामाला सुरुवात झाली आहे (kokan sea turtle). यंदाच्या हंगामातील पहिले घरटे शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी गुहागर किनाऱ्यावर मिळाले (kokan sea turtle). महत्त्वाचे म्हणजे यंदापासून कासव संवर्धनाच्या कामाच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी कांदळवन कक्षाच्या खाद्यावर असणार आहे. (kokan sea turtle)
( Ambarnath ) विधानसभा निवडणुकिसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून येत्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच मतदाराची मतदान केंद्रात गैरसोय होऊ नये यासाठी लक्ष दिले जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांनी दिली.
( Kopri-Pachpakhadi )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात सद्यस्थितीत एकूण ३ लाख, ३८ हजार, ३२० मतदार आहेत. मागील २०१९ ची विधानसभा आणि नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक पाहता या मतदार संघात जेमतेम ५० ते ५६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या कासवांच्या तस्करी सिंडिकेटमधील ’निंजा टर्टल गँग’ म्हणून ओळखल्या जाणार्या तस्करांचे धक्कादायक संबंध भारतीय तपास यंत्रणांनी उघडकीस आणले आहेत. हा शोध मलेशियन अधिकार्यांनी गेल्या महिन्यात वन्यजीव तस्करीवर केलेल्या कारवाईतून लागला. या कारवाईत अनेक टोळी सदस्यांना अटक करण्यात आली,
(Dharavi)धारावीतील क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या 'धारावी प्रीमियर लीग' (DPL) च्या दुसऱ्या हंगामाची सुरुवात शुक्रवारपासून मोठ्या उत्साहात झाली. 'धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या लीगमध्ये धारावीतील स्थानिक खेळाडूंचे एकूण १४ संघ सामील होणार आहेत. धारावीतील 'डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'च्या मैदानावर हे सामने रंगतील. विजेत्या संघाचे पुढील सामने शनिवारी खेळवले जाणार असून अंतिम विजेत्या संघाला आकर्षक चषक आणि १ लाख रुपयांच
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारीचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दि. १३ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने, सहकार्याने कार्य करावे. कोणत्याही लहानात लहान अडचणीलाही गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच मतदानाची टक्केवार
Bangladesh Attack बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. याआधी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कट्टरपंथींनी बांगलादेश सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर बांगलादेशात हिंदू महिलांवर. युवकांवर तसेच शेख हसीनांच्या पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांवर हल्ले केले आहेत. अशातच आता बांगलादेशातील शेख हसीनांच्या आवामी पक्षासोबत जोडल्या गेलेल्या महिला वकील तूरीन अफरोज यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले आहेत.
कोकण किनारपट्टीवरुन यंदा समुद्री कासवांची १ लाख ५८ हजार ८७३ पिल्ले (sea turtle hatchlings) समुद्रात सोडण्यात आली आली आहेत. २०२३-२४ सालच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २ हजार ५६६ घरटी आढळली आहेत. पिल्लांची आणि घरट्यांची ही संख्या २०२२-२४ सालच्या हंगामापेक्षा दुप्पट आहे (sea turtle hatchlings). तसेच पिल्लांचा जन्म होण्याचा दरही ६४ टक्के आहे, ज्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. (sea turtle hatchlings)
कोळंबी पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्राॅल जाळ्यांना 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' (turtle excluder device) उपकरण न लावल्यामुळे अमेरिकेने गेल्या पाच वर्षांपासून भारतामधून होणाऱ्या सागरी कोळंबीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारताला वार्षिक ४ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे करावे लागत असल्याची माहिती 'समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा'ने (एम्पीडा) दिली आहे (turtle excluder device). पावसाळ्यानंतर महाराष्ट्रात 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' वापरण्यासंदर्भातील चाचण्या सुरू होणार असून राज्यातील
चेंबूरमधील माहुल गाव येथे विहिरीत पोहताना एका १५ वर्षीय मुलाचा विजेच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. या विहिरीत बेकायदेशीरपणे हॉटेलसाठी पाणी काढवण्यासाठी मोटार लावण्यात आली होती. त्यामुळे मुलाला विजेचा धक्का लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मृताचे काका वैद्य तुर्बेकर यांनी राम भरोसे रेस्टॉरंटविरुच्या मालकरांविरोधात तक्रार नोंदवली आहे.
महाबळेश्वरमधील एका हाॅटेलमध्ये पाळलेले भारतीय प्रजातीचे कासव वन विभागाने कारवाई करत सोमवार दि. १० जून रोजी ताब्यात घेतले ( indian softshell turtle). या प्रकरणी हाॅटेल मालकाला अटक करण्यात आली आहे. ( indian softshell turtle)
मुंबईत समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळत वाढलेल्या आणि सागरी संशोधक म्हणून कार्यरत प्राची हटकर यांच्याविषयी...
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ही कंपनी करपूर्व १० लाख कोटींचा नफा करणारी पहिलीच भारतीय कंपनी ठरली आहे. रिलायन्स कंपनीच्या रिटेल टेलिकॉम गॅस या रिलायन्स उपकंपन्याचे निकाल काल संध्याकाळी जाहीर करण्यात आले होते. कंपनीच्या एकत्रित महसूलात १० लाख कोटीहून अधिक वाढ झाली आहे.
रशिया आणि इराणशी होणार्या नैसर्गिक वायू व्यापारातून तुर्कमेनिस्तानला फार मोठं उत्पन्न मिळते. पण, बर्डीमुखामेदोव्ह यांच्या अदूरदर्शीपणामुळे रशियाबरोबरचा व्यापार धोक्यात आला आहे. सामान्य जनतेची अवस्था मुळातच अत्यंत दरिद्री आहे. कारण, देशाच्या उत्पन्नापैकी मोठा हिस्सा राजकारणी व हितसंबंधी लोकांच्या खिशात जातो. अशा स्थितीत नैसर्गिक वायूचा व्यापारही जर मंदावला, तर अवस्था आणखीच बिकट होईल.
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या सागरी कासवाला कासवमित्रांनी जीवदान दिले (vengurla sea turtle). या सागरी कासवाच्या तोंडात मासेमारीचा गळ अडकला होता (vengurla sea turtle). अशावेळी इजा झालेल्या कासवाच्या तोंडातून गळ काढून प्राथमिक उपचार करुन कासवमित्रांनी त्याला पुन्हा समुद्रात सोडले. (vengurla sea turtle)
आंध्रप्रदेश संगमेश्वरम किनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून १३८ सागरी कासवांचा ( sea turtles ) मृत्यू झाला आहे. मासेमारीचे हे जाळे अनधिकृतपणे लावल्याची माहिती त्याठिकाणी काम करणाऱ्या 'ट्री फाऊंडेशन'ने दिली आहे. ( sea turtles )
ससा कासवाची गोष्ट अगदी सुपरिचित. वेगाने धावता येऊ शकणारा ससा शर्यत हरतो, तर सावकाश पण स्थिर वाटचाल करणारे कासव मात्र शर्यत जिंकते. अशा बोधकथा आपल्याला बालपणापासूनच पर्यावरणाशी आणि विविध परिसंस्थांशी कळत-नकळतपणे जोडत असतात. मात्र, आता अशाच प्रकारे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला आव्हान देत, एका विशिष्ट प्रजातीचे कासव ही शर्यत पुन्हा एकदा जिंकू पाहतेय.
फ्रान्सच्या नवीन कायद्यानुसार, परदेशातील इमामांना आता फ्रान्समध्ये धार्मिक शिक्षण देण्यासाठी प्रवेशबंदी असेल. इतकेच नाही, तर जे परदेशी इमाम आधीच फ्रान्समध्ये आहेत, त्या इमामांना परत त्यांच्या मायदेशी पाठविले जाईल किंवा देशातील छोट्या मशिदीमध्ये काही तरी काम दिले जाईल. पण, मुळात फ्रान्स सरकारला असा हा कायदा तयार करावासा वाटला, त्याचे कारणही जगजाहीर. ते म्हणजे, फ्रान्स हा युरोपमधील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो.
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे (konkan sea turtle). यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामात संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्लांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे (konkan sea turtle). राजापूरमधील वेत्ये किनाऱ्यावरुन आज सकाळी (१४ डिसेंबर) सागरी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. (konkan sea turtle)
पॅलेस्टाईनची इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने केलेल्या नरसंहारानंतर इस्रायलने कारवाईचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी दहशतवादी आणि त्यांच्या ठिकठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. आता दुसऱ्या टप्प्यात गाझामध्ये जमिनीवर सैन्य उतरवून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या कारवाईत आतापर्यंत ७७०० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. या कारवाईमुळे तुर्कीने आता इस्रायलला 'धर्मयुद्धा'ची धमकी दिली आहे.
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. (sea turtle) यंदाच्या हंगामातील पहिले घरटे आज दि. २६ आॅक्टोबर रोजी राजापूर तालुक्यातील वेत्ये किनाऱ्यावर सापडले. ( sea turtle )
फेडरल बँकेचा Q2 निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. आर्थिक वर्ष २४ चा निर्णय आल्यानंतर फेडरल बँकेने आपली ग्रोत दाखवत मागील ७०३ कोटी नफ्याच्या तुलनेत थेट ९५४ कोटींचा नफा यंदाच्या आर्थिक वर्षात नोंदवला आहे.फेडरल बँकेचा व्यवसाय (Turnover) ४,२५,६८५ लाख कोटींचा झाला आहे.बँकेचा इतिहासात पहिल्यांदाच इतक्या त्रैमासिक नफ्याची नोंद बँकेने केली आहे.
अवघ्या ३२ किमीच्या या जोडणीमुळे एकीकडे तुर्कस्तान, सीरिया, रशिया, अझरबैजान, तर दुसरीकडे सौदी अरेबिया, कुवेत, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकस्तान एवढ्या विस्तृत प्रदेशातली अनेक व्यापारी शहरं बसरा आणि आबादानशी म्हणजेच इराणच्या आखाताशी किंवा पर्यायाने हिंदी महासागराशी जोडली जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या अनुदानात १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण ३०० रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.
लंडनमधील ७० वर्षे जुने ऐतिहासिक 'इंडिया क्लब' दि. १७ सप्टेंबरपासून कायमचे बंद झाले. या इंडिया क्लबने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लंडननजीकच्या या क्लबमध्ये १९३० आणि १९४० च्या दशकात देशाला ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी नेते जमत असतं.
सुप्रसिद्ध एफएमसीजी कंपनी इमामी ला यंदा चांगला नफा झाला आहे.डिसेंबरचा तिमाहीत नफा ५ टक्क्याने वाढून २१९.५२ कोटी झाला आहे.या आधी आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये २०८.९६ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
शांतर्गत वाहन घटक उद्योगाने आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर चालू आर्थिक वर्षात दुप्पटीने विक्रीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का लागला असून मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुरडे यांनी मनसेला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात घडामोडी घडत असताना आता मनसेला मुंबईत खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे कलिना प्रभाग क्र. १६६ चे नगरसेवक संजय तुरडे यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.