"साप कायम सापच राहणार"; दहशतवाद समर्थक 'एर्दोगान'ला इस्रायलने झापले

    29-Oct-2023
Total Views |
 ARDOGAN
 
वॉशिंग्टन डी. सी : पॅलेस्टाईनची इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने केलेल्या नरसंहारानंतर इस्रायलने कारवाईचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी दहशतवादी आणि त्यांच्या ठिकठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. आता दुसऱ्या टप्प्यात गाझामध्ये जमिनीवर सैन्य उतरवून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या कारवाईत आतापर्यंत ७७०० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. या कारवाईमुळे तुर्कीने आता इस्रायलला 'धर्मयुद्धा'ची धमकी दिली आहे.
 
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान म्हणाले की, "गाझामध्ये पॅलेस्टिनींच्या हत्येमध्ये काही देश वगळता पाश्चात्य देशांचा थेट हात आहे. प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, पण त्यात न्याय कुठे आहे? गाझामधील हल्ले थांबवले नाहीत, तर पुन्हा एकदा धर्मयुद्ध सुरू होईल, असे धमकीवजा इशारा त्यांनी इस्रायलला दिला आहे.
 
तुर्कीसह इराणनेही या युद्धासाठी अमेरिकेसह पाश्चात्य देशांना जबाबदार धरले आहे आणि थेट धमकी दिली आहे. त्याच वेळी, कतारसह बहुतेक इस्लामिक देश पॅलेस्टाईनच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. या देशांमध्येच नाही तर जगभरात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत.
 
इस्रायलने एर्दोगन यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून तुर्की आणि त्यांना साप म्हटले आहे. युनायटेड नेशन्समधील इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन म्हणाले, "साप नेहमीच साप असतो." ऊर्जा मंत्री इस्रायल कार्ट्ज म्हणाले, "मुस्लिम ब्रदरहूडचा माणूस हमास-दएश दहशतवादाला पाठिंबा देत आहे."