फेडरल बँक Q 2 निकाल जाहीर : बँकेचा नफा ३५ टक्यांने वाढत ९५४ कोटींवर

    16-Oct-2023
Total Views |

federal bank
 
 
फेडरल बँक Q 2 निकाल जाहीर : बँकेचा नफा ३५ टक्यांने वाढत ९५४ कोटींवर
 

मुंबई:फेडरल बँकेचा Q2 निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. आर्थिक वर्ष २४ चा निर्णय आल्यानंतर फेडरल बँकेने आपली ग्रोत दाखवत मागील ७०३ कोटी नफ्याच्या तुलनेत थेट ९५४ कोटींचा नफा यंदाच्या आर्थिक वर्षात नोंदवला आहे.फेडरल बँकेचा व्यवसाय (Turnover) ४,२५,६८५ लाख कोटींचा झाला आहे.बँकेचा इतिहासात पहिल्यांदाच इतक्या त्रैमासिक नफ्याची नोंद बँकेने केली आहे.
 
बँकेचे Net Interest Income (NII) १६.७ टक्यांने वाढत १७६१ कोटींवरून २०५६ कोटींवर गेले आहे.
 
'दुसऱ्या तिमाहीचे निकाल हे आमच्या अनेक उपक्रमांचे एकत्र येण्याचे चांगले परिणाम आहेत. यामुळे आम्हाला आतापर्यंतच्या वाटचालीत सर्वाधिक नफा मिळाला आहे. Q २ मधील वाढलेल्या गुंतवणूकीमुळे आलेले निकाल हे आमच्या प्रशासन, सामाजिक, पर्यावरणीय मूल्यांची साक्ष देतात.' असे उद्गार बँकेचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम श्रीनिवासन यांनी यावेळी काढले.
 
कंपनीच्या ग्रॉस नॉन परफॉर्मिंग अॅसेटमध्ये गतवर्षीच्या तुलनेत २.२६ टक्यांने कमी होत बँकेने चांगले संकेत दिले आहेत. बँकेतील ठेव देखील २३.१२ टक्यांने वाढली आहे.