चेंबूर : चेंबूरमधील माहुल गाव येथे विहिरीत पोहताना एका १५ वर्षीय मुलाचा विजेच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. या विहिरीत बेकायदेशीरपणे हॉटेलसाठी पाणी काढवण्यासाठी मोटार लावण्यात आली होती. त्यामुळे मुलाला विजेचा धक्का लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मृताचे काका वैद्य तुर्बेकर यांनी राम भरोसे रेस्टॉरंटविरुच्या मालकरांविरोधात तक्रार नोंदवली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, स्थानिकांनी हॉटेल मालकांना विहिरीतून पाणी काढण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर वापरू नका असे वारंवार सांगितले होते. तरीही मालकांनी मोटार इलेक्ट्रिक मोटारचा वापर केला. त्यात आता तक्रारीनंतर अनंत माहुलकर, दयाराम माहुलकर आणि हरिराम माहुलकर या हॉटेल मालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.