नोव्हेंबर २०२४ च्या पोटनिवडणुकीत वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी - वाड्रा यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या भाजप नेत्या नव्या हरिदास यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी - वाड्रा यांना समन्स बजावले आहे.
Read More
( Khar police summons to Kunal Kamra ) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याच्या प्रकरणात मुंबईच्या खार पोलिसांनी कॉमेडियन कुणाल कामरा याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल अरविंद केजरावाल ( Arvind Kejriwal ) यांना पुन्हा नोटीस पाठवली आहे. या प्रकरणात केजरीवाल यांना पाठवली गेलेली ९वी नोटीस आहे. या नोटीस बरोबरच केजरीवाल यांना दिल्ली जल बोर्ड प्रकरणातही नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मनी लॉंड्रींग प्रकरणात अडकलेला बिग बॉस फेम अब्दु रोजिक याची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. नेमकी तो आरोपी आहे की साक्षीदार याबबात त्याच्या वकिलांनी खुलासा केला आहे. अब्दु याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी बोलावण्यात आल्याचे त्याच्या वकिलांनी स्पष्ट केले असल्याचे वृत्त 'आज तक'ने दिले आहे. मूळचा ताजकिस्तानचा असलेला गायक 'बिग बॉस'फेम अब्दु रोजिक आणि मराठमोळा अभिनेता आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे या दोघांना काही दिवसांपुर्वी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
मराठी आणि हिंदी 'बिग बॉस'मधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या शिव ठाकरे याला मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणात ईडी कडून समन्स बजावण्यात आले आहेत.आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर प्रकरणात अली असगर शिराझी याला २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी शिव ठाकरेसह हिंदी बिग बॉस १६ मधील अब्दु रोजिक याला देखील समन्स पाठण्यात आले आहे.
अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान ईडीच्या रडावर आली आहे. ३० कोटींचा घोटाळा करणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर असलेल्या गौरी खानला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली असून गुंतवणूकदार आणि बँकांना ३० कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये गौरी अडकली आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी करणे, चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधीसाठीच्या विशेष न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी योगेश यादव यांनी त्यांच्यावर मानहानीच्या आरोपाखाली खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अभिनेते प्रकाश राज यांना प्रणव ज्वेलर्स मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. प्रकाश राज आपल्या परखड वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. मात्र, आता ते ईडीच्या कचाट्यात अडकल्यामुळे पुढे त्यांच्या अडचणीत किती वाढ होणार आणि संपुर्ण प्रकरणाचा शेवट काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडी ॲपशी संबंधित लोकांची चौकशी करत असून बॉलिवूडचे अनेक कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. आतापर्यंत ईडीने श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, रणबीर कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले. याच दरम्यान, ईडीने मुंबईतील अनेक बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापेमारी केली असून मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे.
काही दिवसांपुर्वी महादेव बुक नावाच्या ऑनलाइन बेटिंग ॲपचे मोठे प्रकरण समोर आले. या ऑनलाइन ॲपअंतर्गत बेकायदेशीर सट्टेबाजीचा खेळ सुरू होता. या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने केलेल्या छापेमारीत तपास यंत्रणेने ४१७ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. आता या प्रकरणात ईडीच्या रडावर अनेक बॉलिवूड कलाकार, गायक आणि राजकीय नेत्यांची चौकशी करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ॲप प्रकरणात पुलकित सम्राट, सनी लिओन, भाग्यश्री अशा मनरों
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी ताजी असतानाच मुंबई महापालिकेसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचे समन्स आल्याची माहिती समोर येत असून ईडीने चहल यांना सोमवार १६ जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचेही माहिती समोर आली आहे.
कोळसा तस्करी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. दि. २ सप्टेंबर रोजी ईडीच्या कोलकाता कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी, 'टीएमसी'चे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी या वर्षी मार्चमध्ये ईडीसमोर हजर झाले होते.
पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या संजय राऊतांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्याच प्रकरणातील दुसरे प्रमुख नाव असलेल्या वर्षा राऊत याही ईडीच्या रडारवर आल्या आहेत
शिंदे गट , भाजप यांच्यावर सातत्याने तोंडसुख घेण्यात मग्न असणारे आणि महाविकास आघाडीचे स्वयंघोषित प्रवक्ते शिवसेना नेते संजय राऊत त्यांचा तकलादू शूरपणा त्यांच्याच अंगलट आला आहे
गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ईडीने ताब्यात घेतले आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली केली आहे
गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात १ हजार ३४ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रविवारी सकाळी ईडीची धाड पडली. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशी नंतर ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतले आहे
पत्राचाळ प्रकरणातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत ईडीच्या ताब्यात गेल्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिंतेत पडले असणार की आता आपला एकमेव मुलाखतकार तर गेला आता मुलाखत घेणार कोण ? अशी बोचरी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी चौकशी सुरू राहणार आहे. त्यासाठी प्रियांका गांधींसह सोनिया चौकशीला जाणार आहेत. त्यामुळे याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी देशभरातील काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. संबंधित ईडी चौकशी कशाप्रकारे षडयंत्र आहे असा बेबनाव रचला जात आहे.
सोनिया गांधींच्या ईडी चौकशीला भाजपचे षडयंत्र असल्याचा कांगावा करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवत उत्तर दिले आहे. मोदी सरकार नव्हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच सोनियांची ईडी चौकशी सुरू असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. अशाच प्रकारे स्वातंत्र्यसैनिकांच्या संपत्तीला गांधी कुटूंबाने स्वतःच्या नावाने वर्ग करुन घेण्याचा प्रकार केला आहे, त्याची पोलखोलच त्यांच्या पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना रविवारी ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मंगळवार, दि. ५ जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता, चौकशीसाठी ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना समन्समध्ये करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला असतानाच, संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना आज ईडीचे समन्स देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडी चे समन्स पाठवण्यात आले आहे. या विषयी संजय राऊत याना उद्या २८ जून ला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
एकीकडे विधान परिषद निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच, महाराष्ट्राचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे.
कोलकाता पोलिसांनी माजी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्रेषित मुहम्मद आणि त्यांची बालवधू आयशा यांच्याबद्दल केलेल्या कथित 'निंदनीय' टिप्पणीच्या संदर्भात समन्स बजावले आहे. नरकेलडांगा पोलिस स्टेशनने समन्स जारी केले आहे. माजी भाजप नेत्याला फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम ४१ ए अंतर्गत या वर्षी दि. २० जून किंवा त्यापूर्वी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
नवनीत राणाप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांना नोटीस
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत दिवसागणिक भर पडत असून इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता ईडीचा ससेमीरा मागे लागण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे. सोमवारी रात्री गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने गवळी यांना ४ ऑक्टोबर रोजी चौकशीला बोलावले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाक्न अब्बासी यांनी काल गिलगीट-बाल्टीस्तानच्या संसदेला भेट देऊन दोन्ही सभागृहांच्या नेत्यांशी चर्चा केली.
'जम्मू-काश्मीरसह संपूर्ण गिलगीट-बाल्टीस्तान हा भारताचा अविभाज्य अंग असून यामध्ये केले जाणारे कसले प्रकारचे बदल भारताकडून सहन केले जाणार नाही' असा थेट इशारा भारत सरकारने पाकिस्तानला दिला आहे.