राहुल गांधी हाजीर हो! 'या' कारणामुळे न्यायालयाने ठोठावला समन्स
27-Nov-2023
Total Views | 102
लखनऊ : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी करणे, चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधीसाठीच्या विशेष न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी योगेश यादव यांनी त्यांच्यावर मानहानीच्या आरोपाखाली खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच न्यायालयाने १६ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
भाजप नेते विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पाच वर्षांपूर्वी विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली होती, त्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, १५ जुलै २०१८ रोजी पक्षाचे कार्यकर्ते अनिरुद्ध शुक्ला आणि दिनेश कुमार यांनी त्यांच्या मोबाईलवरील व्हिडिओ क्लिप दाखवली होती. यामध्ये राहुल गांधींनी अमित शहांना खुनी म्हटले होते.
पत्रकारांशी बोलताना विजय मिश्रा म्हणाले की, "अपशब्द आणि खोटी विधाने करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांनी राजकारणात राहू नये. पाच वर्षांनी आम्हाला न्याय मिळाला आहे, तरीही आणखी सजा होईची आहे." न्यायालयाच्या या निर्णयावर राहुल गांधींनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.