मोठी बातमी! संजय राऊत ईडीच्या ताब्यात!

    31-Jul-2022
Total Views |
 
sanjay
 
 
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ईडीने ताब्यात घेतले आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली केली आहे. वारंवार नोटीस पाठवूनसुद्धा संजय राऊतांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले असल्याने शेवटी रविवारी सकाळी ईडीची धाड राऊतच्या घरावर पडलीच. ईडीच्या कार्यालयातच राऊतांना ईडी कार्यालयातच काढावी लागणार आहे.
 
गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणात संजय राऊत यांचे व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत यांचे नाव आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी सुरु झालं आहे. संजय राऊतांवर ईडीकडून होणारी कारवाई राजकीय सूडबुद्धीनेच होत आहे असा आरोप शिवसेना खा. अरविंद सावंत यांनी केला आहे.