मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतलेला असतानाच, संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला आहेत. शिंदे गटाने विविध मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधी तज्ज्ञ हरीश साळवे बाजू मांडणार आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि उर्वरित शिवसेनेच्या वतीने काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. सोमवारी दि. २७ जून रोजी गुवाहाटीमधील आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. या बाबतची सुनावणी सोमवारी दि. २७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या घडामोडी सुरू असतानाच, संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. प्रवीण राऊत आणि पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.या बाबत संजय राऊत यांनी ट्विट करून मला अटक करा असे म्हंटले आहे.