मोदी सरकार नव्हे हायकोर्टाच्या निर्देशानुसारच सोनियांची ईडी चौकशी!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस नेत्यांवर पलटवार
21-Jul-2022
Total Views | 78
39
मुंबई : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीला भाजपचे षडयंत्र असल्याचा कांगावा करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवत उत्तर दिले आहे. मोदी सरकार नव्हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच सोनियांची ईडी चौकशी सुरू असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. अशाच प्रकारे स्वातंत्र्यसैनिकांच्या संपत्तीला गांधी कुटूंबाने स्वतःच्या नावाने वर्ग करुन घेण्याचा प्रकार केला आहे, त्याची पोलखोलच त्यांच्या पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"नॅशनल हेरॉल्ड या प्रकरणात स्वातंत्र्य सैनिकांनी तयार केलेल्या संस्थेला आपल्या खासगी मालकीच्या केल्या. तब्बल दोन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोनिया गांधी कुटूंबावर आहे. कुठल्याही चौकशीला सामोरे जावे लागले तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. ही चौकशी स्वतः केंद्र सरकारने सुरू केली असती तर त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला असता. मात्र, या चौकशीला दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेशाचा आधार आहे," असे खडेबोल सुनावत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सोनिया गांधींच्या ईडी चौकशीला राजकीय रंग देणाऱ्यांचा समाचार घेतला.