गौरी खानला ईडीने बजावले समन्स, ३० कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंपनीची आहे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर

    19-Dec-2023
Total Views |

gauri khan 
 
मुंबई : अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान ईडीच्या रडावर आली आहे. ३० कोटींचा घोटाळा करणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर असलेल्या गौरी खानला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली असून गुंतवणूकदार आणि बँकांना ३० कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये गौरी अडकली आहे.
 
सध्या ईडीकडून तुलसियानी ग्रुपच्या कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खान तुलसियानी या रिअल इस्टेट ग्रुपची ब्रँड अॅम्बेसेडर होती. या कंपनीने अनेकांना घराच्या बाबतीत फसवल्यामुळे आता या ग्रुपचे मालक अडचणीत आले आहेत. दरम्यान, याचमुळे गौरी खान हिची ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले जात असून यात गौरीला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी तुलसियानी ग्रुपने किती पैसे दिले होते? आणि त्यासाठी काही करार झाला होता का? याची चौकशी होणार असे समजते.
 
काय आहे प्रकरण?
 
मुंबई स्थित किरीट जसवंत शहा यांनी फेब्रुवारीत तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्याविरुद्ध राजधानी दिल्लीतील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी असे म्हटले होते की, गौरी खानने या कंपनीचे प्रमोशन केल्यामुळे त्यांनी २०१५ साली तुलसियानी ग्रुपकडून ८५ लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी केला होता. नंतर कंपनीने त्यांना ताबा दिला नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे आता ईडीच्या कचाट्यात अडकलेल्या गौरी खानचे पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.