जड-चेतनाचा एकत्र अविष्कार म्हणजे जीवसृष्टी! या जीवसृष्टीत सर्वांत वरच्या पायरीवर मानव. ही सर्व सृष्टी व्यवस्थित राहावी, म्हणून तो म्हणतो,
ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजत्तस्रजाम्।
चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह॥1॥
ॐ-अकार सुवर्णाप्रमाणे झळाळणारी, उज्ज्वल, प्रकाशदायी-हरिणीम्-हरिणीप्रमाणे चंचल, हरिणीच्या चंचलपणाचा आरोप लक्ष्मीवर केला आहे-सृजाम्-ढे लीशरींश, ढे िीेर्वीलश, िीेलीशरींश-चंद्राम्-चंद्रासारखी शीतल-हिरण्मयीम्-हिरण्मयः म्हणजे ब्रह्म म्हणून हिरण्मयीम् म्हणजे थहे ळी र्षीश्रश्र ेष ब्रह्म-लक्ष्मीम्-विष्णूची पत्नी. विष्णूचे कार्य योगक्षेमं वहाम्यहम्। लक्ष्मीशिवाय विष्णूला हे कार्य करता येत नाही, ही अष्टसिद्धिंची नायिका आहे. जिच्यामुळे हा विश्वप्रपंच चालू शकतो ती-जातवेदो-अग्नी. सृष्टी उत्पन्न करू शकणारी परिस्थिती-म-मे, माझ्यासाठी-सर्व जगासाठी-आवह-आमंत्रित कर, मंत्रपूर्वक बोलाव. याला विशेष अर्थ आहे. साधे बोलावणे नाकारता येते, मंत्रपूर्वक आवाहन नाकारता येत नाही.
हे जातवेद अग्नी, जी सोन्यासारखी तेजस्वी आहे, जी सर्वदा चंचल आहे, जी चांदिसोन्यासारख्या प्रकाशाची वर्षा करते, सूर्याचे तेज आणि चंद्र व इतर ग्रहांची सौम्यता, शीतलता प्रदान करते, त्या लक्ष्मीला आमच्या कल्याणासाठी आमंत्रित कर.
तां म आ वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्॥2॥
तां-तिला, लक्ष्मीला-म-माझ्यासाठी (आम्हा सर्वांसाठी)-आवह-आमंत्रित कर-जातवेदो-जातवेद अग्नी-लक्ष्मीम्-विष्णू पत्नीला-अनपगामिनीम्-(अपगामिनी म्हणजे अयोग्य मार्गाने जाणारी) म्हणून अनपगामिनीम् म्हणजे जी अयोग्य मार्गाने जात नाही, ती-यस्यां-जिचे-हिरण्यं-सोने हा एक अर्थ व दुसरा अर्थ वीज-विन्देयं-मिळविण्या योग्य, गाय. श्रीसूक्त हे ऋग्वेदात अंतर्भूत होते. म्हणून ऋग्वेदात उल्लेखलेला ‘गो’ शब्दाचा ‘पृथ्वी’ हा अर्थ इथे चांगला बसतो. फळ-फूल-धान्यरूपी भरपूर दूध देणारी पृथ्वीरूपी गाय. गामश्वं-ऋग्वेदात ‘अश्व’ या शब्दाचा अर्थ इंद्रिये, प्राण, अपान वायू असा आहे, तर इंद्रियांवर ताबा मिळवणे, प्राण-अपान यांवर प्रभुत्व मिळविणे, ही खूप कठीण गोष्ट आहे. पण हे प्रभुत्व मिळविता यावे, अशी लक्ष्मीला प्रार्थना आहे. ‘अश्व’ हा शब्द सप्तरंग सूचवितो. सूर्यापासून मिळणारी सर्व, संपूर्ण शक्ती आम्हास मिळो. पुरुषानहम्-पुरुष-म्हणजे अखिल मानवजात.
हे जातवेद लक्ष्मी चंचल आहे, पण ती अपगामिनी नसावी. (चेर्नोबिल, भोपाळ होता कामा नये) तिला आमंत्रित कर. तिच्यामुळे मी इंद्रियांवर, प्राणांवर ताबा मिळवू शकेन. माझा परिवार वाढू शकेल, असे हिरण्य तिच्या जवळच आहे. हे जातवेद अग्नी तिला बोलाव. तिच्यामुळेच पृथ्वी धरा, बहुप्रसवा वसुंधरा होऊ शकेल. तिला आमंत्रित कर.
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवीर्जुषताम्॥3॥
अश्व-इंद्रिये, प्राण-अपान-रथमध्यां-मानवी शरीराला रथ म्हटले आहे व त्यामध्ये असलेली चैतन्यरूपी लक्ष्मी-हस्तिनादप्रबोधिनीम्-श्रीसूक्तात उल्लेखिलेल्या लक्ष्मीला दिशा रुपी गज सुवर्णकुंभातून जलाभिषेक करतात, असे वर्णन आहे.
दिग्गजा हेमपात्रस्थम् आद्य विमलं जलं।
स्नापयांचिकरे देवी सर्वलोक महेश्वरीम्॥
यातील हत्ती किंवा दिग्गज म्हणजे ‘ईशवान मेघ’-इंद्राचा ऐरावत म्हणजे बिजवान मेघ. पावसाळ्यात होणारी मेघगर्जना म्हणजे हस्तीनाद. मेघगर्जना होते तेव्हा विजेचा कडकडाट होतो. यावेळी काय घडते? जीवाच्या अस्तित्वासाठी नेाळपे रलळवी आवश्यक आहेत. त्यातील काही संशोधन शाळेत आपण तयार करु शकतो. बाकीची या मेघगर्जनेत जी वीज निर्माण होते, तेव्हाच निर्माण होतात. ढर्हेीीरपवी ेष र्ीेंश्रीीं ेष शश्रशलीींळलळीूं रिीीशी षीेा ेपश श्रिरलश ीें रपेींहशी. ही परिस्थिती, एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज, माणूस निर्माण करू शकत नाही. दरम्यान आणखी एक क्रिया घडते, ती म्हणजे धान्याच्या बीजाला अंकुरण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळेच पृथ्वी सस्यशामला होऊ शकते.
दिवी दिव्यते इति देवः।
देवी जी अंधाराचा नाश करते आणि प्रकाशते ती!
तिला मी आवाहन करतो. अश्व-म्हणजे इंद्रिये, जी आवरण्यास नाठाळ घोड्याप्रमाणे कठीण असते. अश्वपूर्वां-ही इंद्रिये निर्माण होऊन त्यांचा उपयोग करण्यासाठी जी व्यवस्था लागेल, त्याचे नियोजन केलेली अशी ही ‘अश्वपूर्वा’.
कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम।
पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम्॥4॥
निर्जीव जडसृष्टी आणि जातवेद अग्नी यांचा समन्वय होऊन जीवसृष्टीची निर्मिती झाल्यामुळे, जी स्मितहास्य करीत आहे ती. ‘हिरण्य’ शब्दाचा अर्थ जसा सोने असा आहे, तसाच ‘बीज’ असाही आहे. जीवसृष्टीच्या बीजाला आवरणांत, कुंपणात जपून ठेवणारी शक्ती. आर्द्राम् म्हणजे ओलसर. बीज अंकुरण्यासाठी पाणी-दमटपणा व उष्णता दोन्हींची आवश्यकता आहे. वातावरणात उष्णता आणि पाणी योग्य प्रमाणात असल्यामुळे जी तृप्त झाली आहे व त्यामुळे सर्वांना तृप्त करीत आहे अशी तर्पयन्तीम्. ही निर्मितीची शक्ती फुलात असते. पद्म म्हणजे फक्त कमळ असे येथे होत नाही. कोणत्याही झाडाला पुरेसे पाणी मिळाले नाही, तर त्याला फूल येऊ शकत नाही. म्हणजे फुल नसेल, तर फळही येऊ शकणार नाही. म्हणून ही निर्मितीची शक्ती फुलात देणारी-फुलात असणारी ‘पद्मा’ तिला मी निमंत्रित करतो.
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम्।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥5॥
ही शक्ती चंद्राप्रमाणे शीतल आहे. सूर्याकडून चंद्राला शक्ती मिळते म्हणून ती तापदायक नाही, शीतल आहे. सूर्यमालेतील इतर ग्रहांकडूनही पृथ्वीवर शक्ती येत असते, सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही. चंद्र हा पृथ्वीला सर्वांत जवळचा म्हणून त्याचाच उल्लेख आहे. चंद्र बाकी सर्व ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो, तर या शीतल शक्तीने ती परिपूर्ण होते. आपल्या निर्मितीच्या कामात यज्ञ मिळाल्याने, यश आणि कीर्तीने ती झळाळून गेली आहे. या यशामुळे देवसुद्धा तिची सेवा करतात, तर अशा पद्मिनीला मी शरण आहे. एवढे सर्व दिल्यावर तिने माझ्या हाव, पिपासा, अकर्मण्यता, आलास, लोभ, अविवेकता, असमंजसता, क्रोध, मत्सर वगैरेंचा नाश करावा. ‘ईं’ हे कामकला बीज आहे. याची शक्ती सर्व ब्रह्मांडात, सर्व तरी ‘पद्मिनीमीं’ म्हणताना ‘ईं’चा वेगळा उच्चार झाला पाहिजे. (क्रमशः)
- सुजीत भोगले