‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

    02-May-2025
Total Views | 14


‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!



 सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या ‘बंजारा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतो. दि. 16 मे रोजी प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
 
टीझरमध्ये या तिघांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली होती, पण ट्रेलरमध्ये हा प्रवास नेमका कशासाठी सुरू होतो, याचे धागेदोरे उलगडताना दिसत आहेत. समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे अस्थीविसर्जन करण्यासाठी हे तीन मित्र सिक्कीमकडे निघतात. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतो, जो त्यांच्या मैत्रीत, आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो. पण तो अनुभव नेमका काय आहे, हे चित्रपट बघितल्यावरच कळेल. चित्रपटातील सिक्कीमचे अप्रतिम लोकेशन्स आणि दोन पिढ्यांतील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते. ‘मोरया प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती द्या! सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल

नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला स्थगिती द्या! सुप्रीम कोर्टात तातडीची याचिका दाखल

केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला दि.१६ जुलै रोजी येमेन येथे होणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका ‘सेव्ह निमिषा प्रिया अ‍ॅक्शन कौन्सिल’ या स्वयंसेवी संस्थेकडून दाखल करण्यात आली आहे. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर वरिष्ठ वकील रागेंथ बसंत यांनी याचिकेत बाजू मांडताना म्हटले की, “शरीयत कायद्यानुसार ही फासी रोखता येते. त्यासाठी केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष्य देण्याकरीता आपण निर्देश द्यावे.” अशी विंनती त्यांनी न्यायालयासमोर केली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121