नवी दिल्ली : सीमावर्ती भागात सुरु असलेल्या कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढला आहे. भारताकडून पाकिस्तानातील एअर बेसकॅम्पवर झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानने दि. १० मे रोजी आपले इतर हवाई तळ अनिश्चित काळासाठी बंद केल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाल्याचे दिसतेय.
पाकिस्तानी लष्कराचे म्हणणे आहे की, भारताने त्यांच्या तीन एअरबेसवर बॅलेस्टिक मिसाईलने ९ मे २०२५ रोजी हल्ला केला. पाकिस्तानी लष्कराच्या म्हणण्यानूसार रावलपिंडीजवळील नूर खान एअरबेस, चकवालमधील मुरिद एअरबेस आणि पंजाबमधील रफिक्की एअरबेसवर भारताने हल्ला केला होता. भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेतून याची माहिती देण्यात आली.