FAU-G: Domination चा भव्य शुभारंभ!

अक्षय कुमारचं "Make in India" वर जोरदार सुतराम!

    01-May-2025
Total Views |
FAU-G: Domination चा भव्य शुभारंभ!

मुंबई, वेव्स समिट २०२५ मध्ये आज एक खास आणि देशाभिमान जागवणारा क्षण पाहायला मिळाला, जेव्हा अभिनेता अक्षय कुमारने FAU-G: Domination या नव्या गेमचा अधिकृत शुभारंभ केला. भारतात बनलेल्या या मल्टीप्लेअर मोबाईल गेमचं सादरीकरण करताना अक्षयने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "FAU-G: Domination is LIVE — and Bharat is ready for war! हे केवळ एक गेम नाही, तर भारताचं उत्तर आहे. 'Make in India' अभिमानाने तयार झालेला हा गेम आता अधिक मोठ्या नकाशांमध्ये, अधिक धाडसी मिशन्ससह सादर होत आहे. We play to dominate!"

FAU-G: Domination हा गेम भारतातील स्टुडिओ nCore Games ने विकसित केला असून, तो पूर्णपणे भारतीय सैनिकांच्या प्रेरणेने तयार करण्यात आला आहे. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर याच गेमच्या पहिल्या आवृत्तीची घोषणा झाली होती, आणि आता त्याचा हा नव्याने सुसज्ज, विस्तारित आणि अधिक आकर्षक वर्जन "Domination" म्हणून लॉंच करण्यात आला आहे.
या गेममध्ये आता अधिक रिअलिस्टिक ग्राफिक्स, विस्तारलेली युद्धभूमी, आणि थरारक मिशन्सचा समावेश आहे. गेमच्या मागील यशानंतर याच्या नव्या आवृत्तीवर गेमिंग कम्युनिटीमध्येही प्रचंड उत्सुकता होती. Waves Summit च्या स्टेजवरून झालेला या गेमचा लोकार्पण सोहळा, भारताच्या गेमिंग विश्वात एक नवीन पर्व सुरू करणारा ठरतोय.


या निमित्ताने अक्षय कुमारने पुन्हा एकदा ‘मेक इन इंडिया’च्या संकल्पनेवर भर दिला आणि भारतीय तरुणाईला आपलेच गेम्स खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे.