पाकिस्तानी दहशतवादी मुफ्ती शाह मीरवर गोळीबार करत अज्ञातांकडून हत्या

    08-Mar-2025
Total Views |
 
Mufti Shah Mir
 
इस्लमाबाद (Mufti Shah Mir): पाकिस्तानी गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयच्या वाईट कृत्याचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. आयएसआयने मोठ्या गुन्हेगारांना आणि दहशतवाद्यांना आपले गुप्तहेर बनवून आपला हेतू पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. एका आयएसआयचा एजंट मुफ्ती शाह मीरवर अज्ञातांनी गोळीबार करत हत्या केली. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या अपहरणातही मुफ्ती शाह मीरचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हे गुन्हेगार गुन्हेगारीच्या जगतात वास्तव्य करत असूनही पाकिस्तान गुप्तचर संस्थेसंबंधित बातम्या प्रसारीत करतात. त्याबाबतची माहिती पाकिस्तान आयएसआयला देतात.
 
 
 
बलुचीस्तानात तुर्बत भागातील रहिवासी मुफ्ती शाह मीर आयएसआयच्या आदेशानुसार, लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अवैधपणे नेण्याचा व्यवसाय सुरू ठेवत आहेत. या प्रकरणाच्या आडून तो अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांनी तस्करी करतात. मुफ्ती शाह मीर पाकिस्तानात चालणाऱ्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांनाही भेट देतो, ज्यामुळे त्याला दहशतवादी संघटनेचा भाग मानले जात आहे. त्याचे दुसरे काम म्हणजे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करणे.
 
मुफ्ती शाह मीरने आयएसआयच्या सूचनेवर अफगाणिस्तानात आपली उपस्थिती प्रास्थापित केली. तिथे त्याने स्वत:ची दहशतवादी ओळख असल्याचे सांगितले. पाकिस्तानी लष्कराला अचूक माहिती दिली. शाह मीरने पाकिस्तानपासून अलिकडील काळातील गटांविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. या अशा कृत होत्या ज्यामुळे अचूक माहिती शिवाय शक्य नव्हत्या. पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईमुळे या गटांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.