सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास पुन्हा रखडला! काय घडलं?

    13-Mar-2025
Total Views |
 
Sunita Williams
 
मुंबई : जवळपास गेल्या ९ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतणे पुन्हा एकदा लांबणीवर गेले आहे. त्यांना परत आणण्यासाठी नासानकडून मिशन क्रू -10 राबवण्यात येणार होते. बुधवारी हे क्रू -10 पाठवण्यात येणार होते. परंतू, तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले.
 
फ्लोरिडा येथील स्पेस सेंटरवरून नासा-स्पेसएक्स क्रू-10 मोहिमेला घेऊन जाणारे फाल्कन ९ रॉकेट बुधवारी उड्डाण करणार होते. परंतू, हायड्रोलिक सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे हे मिशन पुढे ढकलण्यात आले आहे. जून २०२४ पासून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आएसएसवर अडकून पडले आहेत. त्या दोघांना परत आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. मात्र, आता हे मिशन पुन्हा कधी लाँच होईल, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.