राज्यातील ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

    18-Feb-2025
Total Views | 61
 
image
 
मुंबई : राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र अद्याप सुरुच आहे. दरम्यान, मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी ९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.
 
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदी नियूक्ती करण्यात आली आहे. तर कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी नेमण्यात आले आहे. यासोबतच नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांची पुणे येथे महिला व बाल आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर. यांची नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त आणि सचिव पदी नेमणूक करण्यात आली आहे.
 
हे वाचंलत का? -  येत्या २८ फेब्रुवारीला रवींद्र नाटयमंदिराचा पडदा उघडणार! मंत्री आशिष शेलार
 
तसेच अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ यांची पुण्यात साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंदकुमार साळवे यांची भंडारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव येथील जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची सोलापूर येथे महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
यासेबतच राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियूक्ती करण्यात आली आहे.
 
 
 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121