मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "मी अनेक खाती..."

    20-May-2025
Total Views | 20

Chhagan Bhujbal

 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली असून शपथविधीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी आजपर्यंत अनेक खाती सांभाळली आहे. आता जे काही खाते मिळेल त्याप्रमाणे निश्चितपणे काम करेन, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जी जबाबदारी देतील त्यापद्धतीने मी काम करेल. १९९१ पासून शपथ घेतो आहे. मंत्री पद येतंय जातंय. मी अनेक खाती सांभाळली आहे. आता जे काही खाते मिळेल त्याप्रमाणे निश्चितपणे काम करेन," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
 
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार!
 
"विशेषत: नाशिक जिल्ह्यात आणि येवला मतदारसंघात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी रडतो आहे. याबाबतीत मी मुख्यमंत्री आणि इतर सगळ्यांशी बोलणार आहे. त्यातून आमच्या शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, यासाठी प्रयत्न करेन. शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे, असे मला वाटते. त्यासाठी मी प्रयत्न करेन," असेही मंत्री छगन भुजबळ यावेळी सांगितले.
 
भुजबळांना कोणते खाते?
 
राष्ट्रवादीचे नेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा कारभार दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधीही त्यांनी या विभागाचे कामकाज सांभाळले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121