'इस्काॅन'चे गजराज आता 'वनतारा'च्या अंगणात

    21-Jan-2025
Total Views | 27
Vantara

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोलकत्तामधील मायपूर येथील 'इस्काॅन'कडे असणाऱ्या दोन हत्तींची रवानगी जामनगर येथील 'वनतारा' (Vantara) या वन्यजीव पुनर्वसन केंद्रात केली जाणार आहे. यासाठी त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने सहमती दिली आहे (Vantara). यामधील एका हत्तींने आपल्या माहुतावर हल्ला करुन त्याला ठार केले होते (Vantara). या पार्श्वभूमीवर 'इस्काॅन'च्या ताब्यातील या दोन हत्तींना आयुष्यभरासाठी 'वनतारा'मध्ये हलविण्यात येणार आहे. (Vantara)
 
 
 
वन्यजीवप्रेमी उद्योजक अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या 'वनतारा'मध्ये लवकरच बिष्पुप्रिया आणि लक्ष्मीप्रिया या दोन मादी हत्ती दाखल होणार आहेत. 'बिष्पुप्रिया' ही १८ वर्षांची असून 'लक्ष्मीप्रिया' ही २६ वर्षांची आहे. 'इस्काॅन'च्या ताब्यात असणाऱ्या या हत्तींपैकी 'बिष्णुप्रिया' या हत्तीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आपल्या माहुतावर हल्ला केला होता. त्यात माहुत ठार झाला. मायापूर येथील 'इस्काॅन'च्या ताब्यात हे दोन हत्ती २००७ सालापासून आहेत. मंदिरातील विविध विधी आणि उत्सवाप्रसंगी या हत्तींचा वापर केला जात होता. त्यामुळे या हत्तींची रवानगी पुनर्वसन केंद्रात करण्याची मागणी विविध प्राणीप्रेमी संस्थांनी केली होती. 'पेटा'सारख्या संस्थेने मंदिरातील विधींसाठी एक यांत्रिक हत्ती देण्याची तयारी देखील दर्शवली होती. याप्रकरणी या हत्तींना 'वनतारा' येथील हत्ती पुनर्वसन केंद्रात पाठवण्याची परवानगी त्रिपुरा उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने दिली आहे.
 
 
 
याविषयी 'इस्कॉन'च्या वरिष्ठ सदस्या हृमती देवी दासी यांनी सांगितले की, "मी स्वतः 'वनतारा'ला भेट दिल्यावर माझ्या लक्षात आले आहे की, याठिकाणी वन्यजीवांची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे 'बिष्णुप्रिया' आणि 'लक्ष्मीप्रिया' यांचे पुढील आयुष्य 'वनतारा'मध्ये चांगला पद्धतीमध्ये व्यथित होईल. याठिकाणी त्यांना साथीदार मिळतील आणि जंगलात मिळणारे स्वातंत्र्य आणि आनंद त्यांना अनुभवता येईल." वनतारामध्ये जगातील सर्वात मोठे हत्तींसाठीचे रुग्णालय असून पुनर्वसन केंद्र देखील आहे. हे केंद्र सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121