तोडफोडीच्या घटनेवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, "हे षडयंत्र..."

    27-Sep-2024
Total Views |
 
Chitra Wagh
 
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची एका अज्ञात महिलेकडून तोडफोड केली आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. हे एखादे षडयंत्र तर नाही ना? असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या घटनेच्या चौकशीचीही मागणी केली.
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या कार्यालयात घुसून एका महिलेने केलेल्या तोडफोडीची सखोल चौकशी व्हावी, तिच्यामागे नेमके कोण आहे, हे उघड व्हायलाच हवंय. सर्वात प्रथम या महिलेची मानसिकता काय आहे हे तपासून तिने केलेले कृत्य कशासाठी केले? यामागील षडयंत्र काय आणि कोणाचे हे पाहायला पाहिजे."
 
हे वाचलंत का? -  "हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंनी दापोलीत..."; शिवसेना आमदाराचं आव्हान
 
"सध्या देवेंद्रजींच्या राज्यभर सभा आणि बैठका होत आहेत. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय लाडक्या बहीणींची योजनेला उदंड प्रतिसाद मिळतोय. हे ज्याला पाहवत नाही त्याने या महिलेच्या हातून तर हे कृत्य करून घेतले नाही ना?, हे ही त्वरित तपासणे गरजेचे आहे," असे त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "ही महिला मंत्रालयात घुसलीच कशी? अशी आवई उठवणाऱ्या विरोधकांना एकच सांगणे आहे, सगळे प्रवेश करतात त्याच पद्धतीने ती गेली असणार. हे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे, त्यामुळे अनेकजण कामासाठी मंत्रालयात येतात, पण प्रत्येकाच्या मनात काय चाललयं हे समजू शकत नाही. सत्यस्थिती समोर आल्यावर स्पष्ट होईलच. तरीही हा एखाद्या षड्यंत्राचा भाग तर नाही ना, याची मात्र त्वरित चौकशी व्हायलाच हवी," अशी मागणी त्यांनी केली आहे.