आनंदयात्री वाङमय मंडळाकडून पुस्तक पाठविण्याचे आवाहन

    24-Sep-2024
Total Views |

कादंबरी  
 
सिंधुदुर्ग : वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङमय मंडळाकडून ‘उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारासाठी’ पुस्तक पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक या राज्यांतील सर्व मराठी लेखकांना या स्पर्धेत सहभागी होता येता येणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतीही विषय मर्यादा नाही केवळ कादंबरी पूर्ण असावी आणि पूर्वी कोणत्याही स्पर्धेत सहभागी केलेली नसावी. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली कादंबरीचाच या पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. कादंबरी पाठविण्यासाठी अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे. इच्छुक लेखक आणि प्रकाशकांनी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा, वेंगुर्ला नजिक, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग ४१६५१६’ या पत्त्यावर २० ऑक्टोबर पर्यंत कादंबरीच्या दोन प्रती लेखकाचे नाव,संपर्क क्रमांक आणि लेखकाची माहिती सहीत पाठवायची आहे. निवड झालेल्या कादंबरीला रोख रुपये १०,००० रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन ‘वेंगुर्ला आयोजित त्रैवार्षिक साहित्य संमेलनात’ गौरविण्यात येणार आहे.