"गोपिकाबाई कणखर, करारी आणि वाकबगार व्यक्तिमत्व होत्या" इतिहास कट्टा' कार्यक्रमात इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांचे प्रतिपादन

    23-Sep-2024
Total Views |

 

इतिहास कट्टा

 

मुंबई : नानासाहेब पेशव्यांची पत्नी व थोरल्या बाजीरावांची लाडकी सून असलेल्या ‘श्रीमंत गोपिकाबाई’ ह्या कणखर राजकारणी, लष्करी मोहिमा आखण्याच्या कामात वाकबगार व करारी कुटुंब प्रमुख होत्या" असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक व लेखक कौस्तुभ कस्तुरे यांनी ‘इतिहास कट्टा’ या कार्यक्रमात केले. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरीवली भाग व बोरीवली सांस्कृतिक केंद्रा तर्फे बोरीवलीतील 'ज्ञानविहार ग्रंथालयात' रविवार, दि.२२ सप्टेंबर रोजी ‘इतिहास कट्टा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कौस्तुभ कस्तुरे प्रमख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कौस्तुभ कस्तुरे यांनी 'श्रीमंत गोपिकाबाई' या विषयावर अभ्यासपूर्ण व इतिहासातील अनेक भ्रामक समजुतींना छेद देणारे व्याख्यान सादर केले. या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रायोजक असलेल्या जनसेवा केंद्र बोरीवलीचे ज्येष्ठ विश्वस्त श्रीधर साठे, संस्कार भारती कोकण प्रांताचे प्रचारक उदयजी शेवडे यांच्यासह अनेक इतिहास प्रेमी चोखंदळ श्रोते उपस्थित होते.