मुंबई : झी टॉकीज वाहिनी तर्फे ‘कथायण चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीतील नवोदित लेखकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या लेखकांच्या कथा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत आणि सोबतच त्यांना भरघोस बक्षिसे जिंकता येणार आहेत. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या प्रथम विजेत्याला ३ लाख, द्वितीय विजेत्याला २ लाख आणि तृतीय विजेत्याला ५०,००० हजार अशी पारितोषिके मिळणार आहेत. इच्छुक लेखकांनी
[email protected] या ईमेल आयडीवर आपली कथा पाठवायची आहे. या स्पर्धेसाठी कथा पाठविण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर आहे.