"जाऊ दे मरु दे त्या मुलीला..."; जितेंद्र आव्हाडांची ऑडिओ क्लिप व्हायरल

    26-Aug-2024
Total Views |
 
Jitendra Awhad
 
मुंबई : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मल्लिकार्जून पुजारी नामक एका व्यक्तीची कथित ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर ही क्लिप पोस्ट केली असून यावरून राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
 
 
 
या ऑडिओ क्लिपमधील संवाद पुढीलप्रमाणे :
 
जितेंद्र आव्हाड : अरे मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका माणसाला एका मुलीवरून ब्लॅकमेल करतोय? हे प्रकरण शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल साहेबांपर्यंत पोहोचलं आहे. नको ते उद्योग कशाला करतोस. तो व्यक्ती टी सीरीजचा मालक आहे.
 
मल्लिकार्जुन पुजारी : मी त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करत नाही. ती मुलगी आपल्याकडे न्याय मागण्यासाठी आली होती. साहेब ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती.
 
जितेंद्र आव्हाड : जाऊ दे मरु दे तिला, फुकट तू कशाला त्यात बदनाम होतोस. तू त्या मुलीमध्ये आणि त्याच्यात पडू नको. त्याला सांग तुझं तू बघ.
 
संदीप देशपांडेंनी ही ऑडिओ क्लिप ट्विट करत जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला. महिला सुरक्षेच्या नावावर राजकारण करणाऱ्या या राजकारण्यांचे महिलांबद्दलचे मत बघा, असे त्यांनी ही क्लिप पोस्ट करताना लिहिले आहे. दरम्यान, ही क्लिप सध्या माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले होते. त्यानंतर आता ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चांणा उधाण आले आहे.