स्वप्निल कुसाळेची ऐतिहासिक कामगिरी; भारताने पहिल्यांदाच जिंकले 'या' क्रीडाप्रकारात पदक!
01-Aug-2024
Total Views |
मुंबई : कोल्हापूरचा नेमबाज स्वप्निल कुसाळे याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या क्रीडाप्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे. या पदकासह भारताच्या खात्यात तिसऱ्या पदकाची भर पडली आहे. स्वप्निल कुसाळेच्या नेत्रदीपक कामगिरीचे देशभरातून कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे देशासाठी या प्रकारातून अद्याप कुणालाही पदक जिंकता आलेले नव्हते. आता स्वप्निलने अतुलनीय कामगिरीच्या जोरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
या नेत्रदीपक कामगिरीनंतर नेमबाज स्वप्निल कुसाळेने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, गेल्या १० वर्षांच्या मेहनतीचे फळ आज मिळाले. मी स्कोअरबोर्डकडे पाहत नव्हतो. मी भूतकाळातील माझ्या चुका सुधारण्यात सक्षम होतो आणि पुढच्या वेळी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करेन, असे ठरविले होते.. मी स्कोअरबोर्ड किंवा इतर काहीही पाहत नव्हते. मी फक्त माझ्या नेमबाजीवर लक्ष केंद्रित केले. अशी भावना स्वप्निल व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी केले कौतुक
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले आहे. उत्तम लवचिकता आणि कौशल्य दाखवित स्वप्निलने केलेली ही कामगिरी विशेष असल्याचेही पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच