बावनकुळेंनी केले आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण!

"एक पेड़ मां के नाम" अभियानाला प्रतिसाद

    06-Jul-2024
Total Views |
bawankule planatation


महाराष्ट्र :       भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री स्व. प्रभावती यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून आदरांजली वाहिली. सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'एक पेड़ मां के नाम' या अभियानाला प्रतिसाद दिला.

नुकतेच १ जुलै रोजी बावनकुळे यांच्या मातोश्री स्व. प्रभावती यांचे अल्प आजाराने उपचारादरम्यान निधन झाले होते. कोराडी येथील बावनकुळे यांनी त्यांच्या निवासस्थानी 'एक पेड़ मां के नाम' या अभियानात सहभागी होत घरीच बिल्व रोप घराच्या अंगणात लावले. यानिमित्ताने आईचा सहवास सदैव सोबत असेल, अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांचे वडील कृष्णराव, पत्नी ज्योतीताई, राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आ. श्वेता महाले, प्रदेश उपाध्यक्ष संजय (बाळा) भेगडे उपस्थित होते.