लाडकी बहीण योजना! ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?

    04-Jul-2024
Total Views |
 
Ladki Bahin
 
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून त्यासाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी गर्दी केलीये. राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणं आणि त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलीये. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे जाणून घेऊया.
 
१. सर्वात आधी गूगल प्ले स्टोरवर जाऊन 'नारी शक्ति दूत ॲप' डाउनलोड करा.
२. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर विचारला जाईल.
३. त्यावेळी Accept trems वर क्लिक करा.
४. लॉगीन करा.
५. त्यानंतर एक ओटीपी येईल
६. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर allow करा.
७. त्यानंतर आपली माहिती पूर्ण भरण्यासाठी निळ्या लिंकवर क्लिक करा.
८. तिथे अर्ज करणाऱ्या महिलेची पूर्ण माहिती भरा. जसे, गाव, तालुका इ.
९. सामान्य महिला सिलेक्ट करा (महिला स्वतः फॉर्म भरत असेल तर)
 
त्यानंतर आपली प्रोफाईल अपडेट होईल.
 
१. आता नारी शक्ति दूतवर क्लिक करा.
२. मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजनावर क्लिक करा..
३. Permission allow करा.
४. त्यानंतर महिलेची किंवा मुलीची संपूर्ण माहिती भरा.
(जसे: जन्म, जन्मस्थान, तालुका, जिल्हा, गाव, ग्रामपंचायत, पिन कोड, फोन नंबर, आधारकार्ड नंबर, इ.)
५. तिथे शासनाच्या आर्थिक योजनाचा लाभ घेता का? हा ऑप्शन येईल
घेत असला तर yes/no भरा.
६. महिला विवाहित आहे का ते भरा.
७. त्यानतंर बँकेचे तपशील भरा.
८. आधार बँकला लिंक आहे का? ते भरा.
 
फॉर्म भरताना लागणारे डॉक्युमेंट्स (1MB पर्यंत)
 
१. आधार कार्ड
२. अधिवास प्रमाणपत्र किंवा
A. रेशनकार्ड
B. मतदान कार्ड
C. जन्म दाखला
D. रहिवासी दाखला
३. उत्पन्नाचा दाखला किंवा
A. रेशनकार्ड
B. Income certificate
४. हमीपत्र सही करू upload करा.
५. पासबुक
 
आता अर्जदाराच्या लाइव फोटो घ्यावा लागेल.
 
त्यानंतर जतन करावर क्लिक करा. 
सगळी माहिती तपासून घ्या.
फॉर्म submit वर क्लिक करा.
तुम्हाला otp येईल तो otp verify करा.