भूस्खलनातील आपद्ग्रस्तांच्या मदतीला संघ स्वयंसेवक आले धावून

    31-Jul-2024
Total Views | 50

RSS Kerala

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
केरळच्या वायनाडमध्ये (Wayanad Landslide RSS) मंगळवार, दि. ३० जुलै रोजी रात्री झालेल्या भूस्खलनात सुमारे ५० घरे जमीनदोस्त झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून या दुर्घटनेत मृतांची संख्या १५० वर पोहोचल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. सुमारे १०० लोक अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल आणि केरळ पोलीस प्रशासन यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुद्धा भूस्खलनातील आपद्ग्रस्तांच्या मदत आणि बचावकार्यात गुंतले असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे वाचलंत का? : उरण हत्या प्रकरणात मोठी अपडेट! दाऊद शेखला ७ दिवसांची पोलिस कोठडी

संघाचे तसेच सेवा भारतीचे स्वयंसेवक सकाळी ठीक ८ वाजल्यापासून मतकार्यात सहभागी झाले आहेत. मदतकार्यात समन्वय साधण्यासाठी मेपपडी येथे हेल्पडेस्क उभारण्यात आला आहे. सेवा भारती आणि पीपीलच्या दोन रुग्णवाहिका सेवा देत आहेत. आतापर्यंत ४८० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. बचावलेल्या लोकांवरही उपचार सुरू आहेत. वायनाडमध्ये अनेक ठिकाणी मदत शिबिरे उभारण्यात आली असून यात ३ हजार हून अधिक लोकांना ठेवण्यात आले आहे.


RSS Kerala

त्यासोबतच मानंथवाडी येथील विश्व हिंदू परिषदेच्या पजहस्सी बालमंदिरातून शेकडो लोकांसाठी अन्न तयार करून घटनास्थळी नेण्यात आले. वायनाडमधील सेवा भारतीचे चिताग्नी युनिट रात्रीच्या वेळीही अंत्यसंस्कार करत होते. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी रात्रीच्या वेळी जेवणाची व्यवस्था केली.

अग्रलेख
जरुर वाचा
क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही"; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121