अखंडित वातानुकूलित सेवेसाठी पश्चिम रेल्वे सज्ज

एसी लोकलमधील अडचणी सोडविण्यात पश्चिम रेल्वेला यश

    03-Jul-2024
Total Views |

western railway


मुंबई, दि.३ :
मुंबई उपनगरीय मार्गावर पश्चिम रेल्वेची वातानुकूलित (एसी) लोकल सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाली असून एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पश्चिम रेल्वे ७ रेक असलेल्या ९६ एसी लोकल सेवा चालवत आहे. त्यामुळे या एसी ईएमयू लोकलच्या सक्षम देखभालीसाठी पश्चिम रेल्वेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याला आता यशही आले आहे. पश्चिम रेल्वे अभियंत्यांच्या प्रयत्नांमुळे एसी रेकमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल, कांदिवली आणि विरार येथील ईएमयू कारशेडच्या टीमने रेकमधील वातानुकूलित यंत्रणेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कृती आराखडा (RAP) तयार केला होता. या समस्या निर्माण करणारे प्रमुख घटक सर्व वातानुकूलित रेकच्या कठोर चाचणी आणि डेटा विश्लेषणाद्वारे ओळखले गेले. दोषांचे गंभीर विश्लेषण केल्यानंतर, त्यांचे विविध हेड आणि उप-हेडमध्ये वर्गीकरण करण्यात आले. रूफ माऊंटेड पॅकेज युनिट (RMPU), ट्रॅक्शन मोटर(TM), ऑटोमॅटिक डोअर क्लोजर (ADC) आणि BHEL इलेक्ट्रिक आणि उपकरणे यांच्याशी संबंधित काही प्रमुख समस्या लक्षात घेतल्या.
-----

विश्वासार्हता कृती आराखडा हा सांघिक कार्य, नावीन्य आणि प्रतिकूल परिस्थितीत दृढ निश्चयाचा पुरावा आहे. पश्चिम रेल्वे टीमने केवळ आव्हानांवरच मात केली नाही तर पूर्वीपेक्षा अधिक मजबूत देखील बनले आहे. परिश्रमपूर्वक धोरणात्मक नियोजन आणि सहयोगी प्रयत्नांमुळे एसी रेकमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

-विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी,पश्चिम रेल्वे