ट्रम्प यांच्या हत्येसाठी आंतरराष्ट्रीय कट? 'या' देशाचा सहभाग असल्याचा संशय

    17-Jul-2024
Total Views | 66
 Donald Trump
 
वॉशिंग्टन डी.सी : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये हल्ला करण्यापूर्वी त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, अशी गुप्त माहिती समोर आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराण हल्ला करू शकतो, अशी माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यामुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती जून महिन्यात मिळाली होती. यानंतर त्याच्याभोवती अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. ही माहिती मानवी स्रोताद्वारे मिळाली आहे कारण गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीवर सतत चर्चा होत आहे.
 
माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कारकिर्दीत इराकमध्ये वरिष्ठ इराण लष्करी कमांडर कासिम सुलेमानी याच्यावर ड्रोन हल्ला झाला होता. यामध्ये सुलेमानी याचा मृत्यू झाला होता. हा हल्ला अमेरिकेनेच केला होता. तेव्हापासून इराणकडून ट्रम्प यांच्या जीवाला धोका आहे. इराणच्या सुप्रीम नेत्यांनी ट्रम्पला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
  
व्हाईट हाऊसने या संदर्भात म्हटले आहे की ते ट्रम्प यांच्या जीवाला इराणच्या धोक्याचा सतत आढावा घेत आहेत. सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्याच्या धमक्या इराणकडून आल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. इराणने हे आरोप पूर्णपणे निराधार आणि द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघातील इराणच्या प्रवक्त्यानेही ट्रम्प यांना गुन्हेगार म्हटले आहे.
  
इराणने या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “इराणच्या दृष्टिकोनातून ट्रम्प हे गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर जनरल सुलेमानी यांच्या हत्येचा आदेश दिल्याबद्दल खटला चालवला गेला पाहिजे आणि त्यांना न्यायालयामध्ये शिक्षा झाली पाहिजे. इराणने त्यांना शिक्षा देण्यासाठी कायदेशीर मार्ग निवडेल."
 
ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराशी इराणचे कोणतेही संबंध अद्याप समोर आलेले नाहीत. हा धोका स्वतंत्रपणे ज्ञात झाला आहे. उल्लेखनीय आहे की, दि. १३ जुलै २०२४ रोजी एका रॅलीला संबोधित करताना २० वर्षीय हल्लेखोराने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात तो जागीच ठार झाला.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121