नणंद की, भावजय? बारामतीत कुणाची बाजी?

    04-Jun-2024
Total Views |

Pawar 
 
पुणे : लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली असून यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचच लक्ष लागून आहे. बारामतीत यंदा सुप्रीया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. दरम्यान, आतापर्यंतच्या निकालानुसार याठिकाणी सध्या सुप्रीया सुळे आघाडीवर दिसत आहेत.
 
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रीया सुळे या सध्या २० हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार मैदानात होत्या. राज्यात यंदा महायूती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. या लढतीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. निकालाच्या आधीच ठिकठिकाणी अनेक उमेदवारांच्या विजयाचे बॅनरही झळकले आहेत.
 
यावर्षीच्या निवडणूकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शनिवारी निकालाचे एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. यातील अनेक एक्झिट पोलमध्ये पुन्हा महायूतीचीच सत्ता येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात पुन्हा महायूतीचे सरकार येणार की, महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.