अखेर आरोपी वेदांतने दिली कबुली, म्हणाला...

    03-Jun-2024
Total Views | 342
 
Pune
 
पुणे : पुणे कार अपघात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून आता आणखी एक खुलासा झाला आहे. या अपघातातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवालने अपघातावेळी मद्य प्राशन केले असल्याचे कबुल केले आहे. तसेच शिवानी अग्रवालने आरोपीचे ब्लड सँपल बदलण्याकरिता स्वत:चे ब्लड दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
पोलिसांच्या चौकशीवेळी आरोपी वेदांतने सांगितले की, अपघाताच्यावेळी त्याने दारू प्यायली होती आणि तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला काहीही आठवत नाही. याप्रकरणात संपूर्ण अग्रवाल कुटुंब सध्या पोलिस कोठडीत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
 
हे वाचलंत का? - जनतेसाठी कोण खास? उरलेत अवघे काहीच तास!  
 
१९ मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने चालविलेल्या पोर्श कारची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात दोन आयटी व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील आरोपीची आई शिवानी अग्रवालने त्याला वाचवण्यावण्याकरिता ब्लड सँपल बदलले होते. शिवानी अग्रवालने वेदांतऐवजी स्वत:चे ब्लड सँपल दिले होते.
 
त्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी कार चालकाला धमकावल्याने त्यांनादेखील अटक करण्यात आली आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121