IPO Update: United Cotfab Limited कंपनीचा आयपीओ १३ जूनपासून शेअर बाजारात!

प्राईज बँड ७० रुपये प्रति समभाग निश्चित

    10-Jun-2024
Total Views |

IPO
 
मुंबई: युनायटेड कोटफॅब लिमिटेड (United Cotfab Limited) कंपनीचा आयपीओ १३ जूनपासून बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १९ जून दरम्यान हा आयपीओ (Initial Public Offering) बाजारात गुंतवणूकदारां साठी दाखल होणार आहे. २० जूनपर्यंत या कंपनीच्या आयपीओतील समभागाचे वाटप २० जूनपासून करण्यात येईल.
 
आयपीओसाठी प्राईज बँड ७० रुपये प्रति समभाग निश्चित करण्यात आला आहे. बीएसई एसएमई (BSE- SME) अंतर्गत ही कंपनी सूचीबद्ध (Listing) होणार आहे. २४ जूनपासून ही कंपनी बाजारात नोंदणीकृत होणार आहे. २००० समभागांचा एक गठ्ठा (Lot) असणार आहे. या आयपीओत गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदारांना कमीत कमी १४०००० रुपये गुंतवावे रंगणार आहेत.
 
कंपनीच्या माहितीप्रमाणे, Beeling Capital Advisors Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Purva Sharegustry India Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा २१ जूनपर्यंत मिळणार आहे.
 
एकूण आयपीओपैकी गुंतवणूकीचा ५० टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) साठी उपलब्ध असणार आहे तर इतर गुंतवणूकदारसाठी ५० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे. निर्मलकुमार मित्तल व गगन मित्तल हे कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) आहेत. २०१५ साली या कंपनीची स्थापना केली गेली होती.ही कंपनी टेक्सटाइल व तत्सम उत्पादनां च्या सेवा सुविधा पुरवते.
 
३१ मार्च २०२४ व ३१ मार्च २०२३ या एक वर्षाच्या आर्थिक काळात कंपनीच्या महसूलात (Revenue) मध्ये १७९४५.५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये ६१२१.४६ टक्क्यांनी वाढला होता.आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२३ मधील ६४.०२ कोटींचा महसूल वाढत ३१ मार्च २०२४ मध्ये ११५५२.७४ कोटींवर पोहोचला आहे ३१ मार्च २०२३ मधील १३.९३ कोटीवरून नफा वाढत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढत ८६६.६५ कोटींवर पोहोचला आहे.
 
३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १२०.३३ कोटी होते. कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी, दैनंदिन कामकाजासाठी पब्लिक इश्यू खर्चासाठी करण्यात येणार आहे.