"पुन्हा कुठल्याही धर्माबाबत..."; स्टॅण्डअप कॉमेडियन प्रियांश कौशिकचा माफीनामा!

गो-मातेचा आणि नंदी बैलाचा अपमान करणे भोवले

    02-Apr-2024
Total Views |

Priyansh Kaushik

मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन प्रियांश कौशिक (Priyansh Kaushik) याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर वादाचे कारण ठरत आहे. केवळ आपल्या चाहत्यांना हसवण्याच्या उद्देशाने प्रियांशने आपल्या एका स्टॅण्डअप दरम्यान गो-मातेचा आणि नंदी बैलाचा अपमान केल्याचे निदर्शनास आले आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे नेटकऱ्यांनी आणि अनेक गोरक्षकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे याप्रकरणी प्रियांशने एका व्हिडिओद्वारे जाहीर माफी मागितल्याचे समोर येत आहे. स्टॅण्डअपचा संपूर्ण व्हिडिओ सध्या युट्युब चॅनलवरून हटवण्यात आला आहे.
 

'गो-माता आणि नंदीबैलावर टिपण्णी करणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर पोस्ट केला होता. त्यात वापरलेल्या आशयामुळे हिंदू समाजातील अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी स्वतः गाईला मातेसमान मानतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. त्या सर्वांची मी हात जोडून माफी मागतो. माणसकडून चूका होतच राहतात. मी आश्वस्त करतो की, यापुढे कधी कुठल्याही धर्माबाबत टिपण्णी करणार नाही.', असे म्हणत प्रियांशने माफी मागितली आहे.


नेमकं काय घडलं होतं?
स्टॅण्डअप कॉमेडियन प्रियांश कौशिक आपल्या एका स्टॅण्डअप दरम्यान उपस्थितांना गो-माता आणि नंदीबैलावर टिपण्णी करत त्यांचे मनोरंजन करत होता. 'गाय अगर माता है तो सांड भी अॅटलिस्ट चाचा है. मै निश्पक्ष होकर तुम्हे स्नेह दुंगा, पर थोडा दूर से.' असे म्हणत तो पुढे हे देखील म्हणाला की, 'हे परमात्मा, यदी कभी जाने अनजाने मै किसी सांड को आहट पोहचाऊ तो मुझे तभी भस्म कर देना...आमिन!' प्रियांशचे हे शब्द ऐकून उपस्थित प्रेक्षकही खळखळून हसत होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी आणि काही गो-रक्षकांनी प्रियांशवर निशाणा साधत टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.