करिना, तब्बू व क्रितीच्या 'क्रू'ने पहिल्याच दिवशी गाजवले बॉक्स ऑफिस

    30-Mar-2024
Total Views |
एकता कपूर निर्मित ‘क्रु’ चित्रपटाने बऱ्याच काळानंतर हिंदी चित्रपटसृष्टीला पहिल्याच दिवशी चांगले दिवस दाखवले आहेत.
 

crew  
 
मुंबई : एकता कपूर निर्मित आणि राजेश ए. कृष्णन दिग्दर्शित ‘क्रु’ (Crew Movie) चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हॅट्रिक केली आहे. तब्बू, करीना कपूर खान, क्रिती सेनॉन यांचा ‘क्रू’ चित्रपट पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा पहिला महिलांचा चित्रपट ठरला आहे. २९ मार्च 'गुड फ्रायडे' च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तब्बल २५०० स्क्रीन्स मिळाल्या होत्या. ‘क्रु’ (Crew Movie) चित्रपटाची कथा तीन एअर होस्टेसची असून ज्यांच्या आयुष्यातील समस्या, आर्थिक अडचणी आणि त्यातून होणारी धमाल दाखवण्यात आली आहे. जाणून घेऊयात पहिल्याच दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे.
 
 
 
'क्रू'ची कमाई
 
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा या हिंदी चित्रपटाने ओपनिंग डेला चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ‘क्रु’ ने ९.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४.७ कोटी कमवत आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण १३.३२ कोटी कमावले आहेत.तर जगभरात या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २० कोटी कमावले आहेत.