धर्मांतरणाचा डाव गावकऱ्यांनी उधळला; सफळ्यातील नागरिकांचा संताप!

    26-Mar-2024
Total Views |
Conversion Case Palghar

खानिवडे :
पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या माकणे गावात धर्मांतरण करवून घेत असल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे माकण्यासह सफाळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आमच्या धर्मात काय कमी आहे , आम्ही कधी दुसऱ्या धर्माला विरोध करतो का , आम्ही कधी दुसऱ्या धर्मांना आमच्या धर्मात या म्हणून प्रलोभने दाखवतो का , मग तुमचा हिंदूंवर धर्मांतरसाठी अट्टाहास का असा संतप्त सवाल वरील धर्मांतराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिक करत असून आता धर्मांतर घडवून आणणाऱ्या विरोधात येथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.हा प्रकार धर्मांतर घडावं म्हणू माकणे गावात प्रार्थना करून हिंदूंना जाळ्यात अडकवण्याचे काम सुरू असल्याचे एका ध्वनीचित्रफितीतून समोर आले. ही चित्रफीत सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत असून ज्या भागात हा प्रकार घडला आहे त्या गावात एकही ख्रिश्चन नसताना घडल्याने तो जिल्ह्यात चर्चेचा मुद्दा ठरला आहे.


तर असे धर्मांतर गरीब वंचित समाज व आर्थिक , मानसिक , शारीरिक आरोग्य अडचणीत आलेल्या कुटुंबांना पैसे व इतर वस्तूंच्या आमिषाला बळी पाडून धर्मांतर हा प्रकार घडवून आणले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे समाजात संतापाची लाट उसळत आहे. प्रलोभातून धर्म परिवर्तन व शोषण असे अनेक प्रकार याआधीही पालघर जिल्ह्यात समोर आले आहेत येत आहेत .आठवडाभरा पूर्वी वाढीव गावातही असाच प्रकार घडला होता. तेथील जागरूक ग्रामस्थांनी धर्मांतरणाचा प्रयत्न करणाऱ्या पिटाळून लावले होते. त्यानंतर तसाच प्रकार शुक्रवारी माकणे गावात घडला. मात्र येथील गावातील ग्रामस्थांनी आक्रमक होऊन हा डाव हाणून पाडला. पोलिसांनी मात्र तेथे धर्मांतराचा प्रकार नसून केवळ प्रार्थना घेण्यात येत होती असे सांगितले .मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असल्याने अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पोलिसांकडून सफाळेत जन संवादाची गरज आहे. तर अशा घटना घडत असतील किंवा त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होत असेल तर तातडीने पोलिसांना सांगा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पालघर मध्ये धर्मांतरणाचे छुप्या पद्धतीने काम सुरू आहे. परवा घडलेली माकणे गावातील घटना गावामध्ये एकही ख्रिश्चन व्यक्ती नसताना भोळ्या भाबड्या जनतेला गोळा करून धर्मांतर करण्याचा व समाजामध्ये दूही मा जवण्याचा प्रकार सुरू होता तो त्या दिवशी गावकऱ्यांनी एकत्र येऊन उधळून लावला आहे यापुढे जर असे सुरू राहिले तर विश्व हिंदू परिषद यामध्ये उडी घेऊन हे काम रोखण्याचा इशारा देत आहे. सुशील शहा जिल्हा मंत्री पालघर विश्व हिंदू परिषद

जगाने मान्य केलेले आपलं वाङ्मय इतकं भक्कम असताना हा प्रकार घडत असेल तर समाजात प्रबोधन करण्यात आपण कमी पडलो आहोत का असा प्रश्न निर्माण होत असून चमत्कारावर काही समाज बांधव भुलत आहेत .त्यांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा विचार घ्यावा व आपल्याला जन्मजात लाभलेल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा .रसुभाऊ पाटील - आगरी समाज उन्नती मंडळ उपाध्यक्ष

आपली हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे आणि आपल्या संस्कृती सारखी संस्कृती नाही मग आपण आपली हिंदू संस्कृती जतन करा दुसऱ्याच्या संस्कृतीत जाण्यापेक्षा आपल्या संस्कृती ला मोठे करा.गीता तरे (पाटील ) माकणे गृ ग्रा पं सदस्या 


तेथे प्रार्थना करण्यात येत होती .मात्र त्या जगेल कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे प्रथम निदर्शनास येत आहे .येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे .नागरिकांनी संयम बाळगून तसाच कोणताही प्रकार दिसल्यास पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा .मंडाले - पोलीस निरीक्षक सफाळे पोलीस ठाणे .