महिला दिनाच्या निमित्ताने बँक ऑफ बडोदाच्या बचत तसेच चालू खात्यांवर ऑफर

महिला ग्राहकांना रिटेल लोनवर प्राधान्य व्याज दर, प्रक्रिया शुल्कावर 100% सूट, लॉकर शुल्कावर 50% सूट आणि bob महिला शक्ती सेव्हिंग अकाउंट किंवा bob विमेन पॉवर करंट अकाउंट उघडण्यावर इतर लाभ

    12-Mar-2024
Total Views | 54

Bank of Baroda
 
 
मुंबई: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, बँक ऑफ बडोदाने आज आपल्या महिला खातेदारांसाठी bob महिला शक्ती सेव्हिंग अकाउंट किंवा bob विमेन पॉवर करंट अकाउंट उघडण्यावर आकर्षक ऑफर आणि लाभांची घोषणा केली. ही ऑफर ३० जून २०२४ पर्यंत उघडलेल्या खात्यांसाठी आणि ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत घेतलेल्या कर्ज सुविधांना लागू आहे.
 
bob महिला शक्ती सेव्हिंग अकाउंट किंवा bob विमेन पॉवर करंट अकाउंट आता केवळ महिलांसाठी विविध ऑफरसह उपलब्ध आहेत. ज्यात रिटेल लोनवर 25 बेसिस पॉईंट व्याज दर सवलत (दुचाकी कर्जावर 0.25% सवलत, शैक्षणिक कर्जावर 0.15% सवलत, 0.10% वाहन कर्जावर,गृहकर्ज आणि गहाण कर्ज) रिटेल लोनवर प्रक्रिया शुल्काची संपूर्ण माफी (वैयक्तिक कर्जासह) तसेच वार्षिक सुरक्षित ठेव लॉकर शुल्कावर 50% सूट मिळेल.
 
बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) देबदत्त चंद म्हणाले, "बँक ऑफ बडोदा ही महिलांसाठी एक विश्वासार्ह बँकिंग भागीदार आहे. यंदा आंतरराष्ट्रीय महिला दिनी, आम्ही महिला आणि त्यांच्या चालणाऱ्या उद्योगांना पाठिंबा देऊ इच्छितो. आर्थिक सक्षमीकरण आणि स्वातंत्र्याच्या दिशेने त्यांच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्याची इच्छा आहे.”
 
Bob महिला शक्ती सेव्हिंग अकाउंट ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक अपघात विमा संरक्षणासह विनामूल्य रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड, विनामूल्य डोमॅस्टीक एअरपोर्ट लाउंज प्रवेश (दर तिमाहीत 2) विनामूल्य एसएमएस अलर्ट,दरवर्षी विनामूल्य 30 पानी धनादेश आणि ऑटो स्वीप सुविधा उपलब्ध करून देते.
 
Bob वुमन पॉवर करंट अकाउंट हे महिला उद्योजक आणि व्यवसाय चालविणाऱ्या महिलांसाठी तयार केलेले एक समर्पित चालू खाते आहे. bob वुमन पॉवर करंट अकाउंट महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाला आधार देण्यासाठी वाढीव विशेषाधिकार आणि वैशिष्ट्ये प्रदान करते. ही वैशिष्ट्ये म्हणजे रोख ठेव शुल्कात सवलत, क्यूआर कोडसह पूरक 2 साउंडबॉक्स आणि 1 पीओएस/एमपीओएस, रु. 25 लाखांपर्यंत जामीन-मुक्त ओव्हरड्राफ्ट सुविधा, विनामूल्य आरटीजीएस/एनईएफटी/आयएमपीएस/यूपीआय (ऑनलाइन पर्यायांद्वारे), स्वीप सुविधा आणि मासिक सरासरी शिल्लक आवश्यकता रु. 10,000 पेक्षा कमी, असे इतर अनेक फायद्यांचा समावेश.
 
 
Bob महिला शक्ती सेव्हिंग अकाउंटची प्रमुख वैशिष्ट्येः
 
• रिटेल लोनवर सवलतीचे व्याज दर (दुचाकीस्वार कर्जावर 0.25%, शैक्षणिक कर्जावर 0.15%, वाहन कर्ज, गृह कर्ज आणि गहाण ठेवी कर्जावर 0.10% सवलत)
 
• वैयक्तिक कर्ज, वाहन/दुचाकी कर्ज, शिक्षण कर्ज, गृह कर्ज, गहाण ठेव कर्ज यांच्या प्रक्रिया शुल्कावर 100% सूट
 
• वार्षिक सुरक्षित ठेव लॉकर शुल्कावर 50% सूट
 
• आघाडीच्या ब्रँडवर आकर्षक ऑफरसह रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड विनामूल्य जारी करणे सोबत रुपये 2 लाख पर्यंतचे विनामूल्य वैयक्तिक अपघात विमा संरक्षण
 
• मोफत डोमॅस्टीक एअरपोर्ट लाऊंज एक्सेस (2 दर तीन महिन्यांना)
 
• वर्षाला 30 पानी विनामूल्य धनादेश
 
• विनामूल्य एसएमएस अलर्ट
 
• ऑटो स्वीप सुविधा उपलब्ध
 

Bob वुमन पॉवर करंट अकाउंटची प्रमुख वैशिष्ट्येः
 
 
• रिटेल लोनवर सवलतीचे व्याज दर (दुचाकीस्वार कर्जावर 0.25%, शैक्षणिक कर्जावर 0.15%, वाहन कर्ज, गृहकर्ज आणि तारण कर्जावर 0.10% सवलत)
 
• वैयक्तिक कर्ज, वाहन/दुचाकी कर्ज, शिक्षण कर्ज, गृह कर्ज, गहाण ठेव कर्ज यांच्या प्रक्रिया शुल्कावर 100% सूट
 
• वार्षिक सुरक्षित ठेव लॉकर शुल्कावर 50% सूट
 
• एमएबी’च्या 10 पटांच्या अधीन दररोज 1,00,000/- रुपयांपर्यंतच्या रोख ठेव शुल्कात सवलत
 
• क्यूआर कोड आणि 1 पीओएस/एम. पी. ओ. एस. सह विनामूल्य 2 साउंडबॉक्स
 
• रु. 25,00,000 पर्यंतचे जामीन-मुक्त विनामूल्य ओव्हरड्राफ्ट
 
• विनामूल्य आरटीजीएस/एनईएफटी/आयएमपीएस/यूपीआय (ऑनलाईन पद्धतीने)
 
• ऑटो स्वीप सुविधा उपलब्ध
 
• विनामूल्य 50 पानी धनादेश
 
• व्हिसा व्यापार डीआय डेबिट कार्ड
 
• आजीवन मोफत कॉर्पोरेट क्रेडीट कार्ड (पात्रतेअधीन)
 
• खास करून तयार करण्यात आलेल्या कॅश मॅनेजमेंट सेवा आणि इंटरनेट पेमेंट गेटावे (आयपीजी) सुविधा उपलब्ध
• रु. 10,000/-ची मासिक सरासरी जमा
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्‍या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121