समाजहितासाठी युवा कार्यकर्ता संमेलन

    06-Feb-2024
Total Views |
Yuva Social Workers Sammelan

मुंबईतील विविध भागातील सामाजिक संस्थांच्या माध्यमांतून ... आपला समाजकार्य करणार्‍या युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा संमेलन दि. १४ जानेवारी रोजी कबड्डी महर्षी शंकरबुवा साळवी (कबड्डी अससोसिएशन) सभागृह याठिकाणी आयोजित केले होते. त्या संमेलनाचा घेतलेला मागोवा...

विविध सामाजिक संस्थाच्या सहभागातून युवा कार्यकर्ता संमेलन साजरे झाले. हे संमलेन ‘खीं’ी -श्रश्र खप ढहश चळपव’ या संकल्पनेवर आधारित होते.
 
खरे आहे ना हा सगळं मनाचाच खेळ असतो.
 
मन करा रे प्रसन्नं ।
सर्व सिद्धीचें कारण ।
मोक्ष अथवा बंधन ।
सुख समाधान इच्छा ते ॥
असे तुकाराम महाराज सांगतात,
किंवा रामदास स्वामी मनाचे श्लोक लिहितात
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
त्यामुळे हे सारे मनाचे खेळ घडवण्यासाठी ती सकारात्मकता या विचारांमधून पोहोचवण्यासाठी.
 
संमेलनाचा उद्देश आजच्या युवामध्ये सकारात्मकता वाढवणे हा होता. युवक ही मोठी शक्ती आहे, ही शक्ती जर सार्वजनिक जीवनात झोकून काम करण्यास तयार झाली तरच समाजात सम्यक क्रांती घडू शकते. हे संमेलन समाजात शतकानुशतके चालत आलेल्या सामाजिक परंपरा, मूल्ये, तत्वे (समाजाची स्थिती शीलता) आणि काळानुरूप समाजात घडणारे बदल (समाजाची गतिशीलता) या दोहोंचा वेध आजच्या युवा पिढीने समजून देणारा होता. मी इथे देण्यासाठी आहे घेण्यासाठी नाही हा विचार मनात रुजवणारा होता. आपले युवा हे स्वतःच्या ‘ठर्शीीाश’चे विक्रेते न बनता समाजासाठी योगदान देणारे उद्योजक बनावेत. ‘माझ्या जीवनाचा उद्देश काय? ’आर्थिक असुरक्षिततेचा बागुलबुवा करून, भौतिकदृष्ट्याच स्थिर होणे हेच काय आयुष्याचे इतीकर्तव्य आहे का? अवाजवी अपेक्षा आणि अमर्यादित उपभोगाच्या आकांक्षा तयार करून स्वतःची कृतिशीलता व प्रयोगशीलता खुंटून टाकायची का? तर नाही तरुणाईने स्वत:सोबत समाज धर्म आणि देशासाठीही विचार करणे आवश्यक आहे. काम करणे आवश्यक आहे. तसेही ‘स्व:’ची आणि ‘स्वधर्मा’ची ओळख ही निव्वळ गुहेत बसून होत नाही, तर समाजाच्या गरजांना सामोरे जाऊन होते. निर्जीव माहितीचे भेंडोळे, परीक्षा व पदव्यांचा सुळसुळाट, रेझ्युमेची शर्यत, ‘सक्सेस’ची जीवघेणी स्पर्धा, अवाजवीअपेक्षांचे ओझे यांच्या चक्रव्यूहात अडकलेले आपले युवा अभिमन्यू हे स्वधर्मचा शोध घेणारे अर्जुन व्हावेतही अपेक्षा आहे. युवा पिढीला सर्वाथाने अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगण्याचा हक्क आहे हे मांडण्यासाठी हे युवा कार्यकर्ता संमेलन होते.
 
आज भारताचं सामर्थ्यचं आपली सर्वाधिक युवा लोकसंख्या आहे. पण आजची तरुण पिढी जीवघेण्या स्पर्धेच्या युगात गुरफटली आहे. त्यामधूनच सुरुवातीलान्यूनगंड निर्माण होणे पुढे नैराश्याचं जाळं आणि त्यामधून आत्महत्येसारखी टोकाची पावलं सहज उचलली जात आहे. पण तुमचा माईंडसेट सकारात्मक असेल, तर त्यामधून केले जाणारे प्रयत्न आणि हाती येणारे यशदेखील तितकच खास असणार आहे. याच अनुषंगाने १४ तारखेला विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आलेल्या युवकांनी प्रथम सत्रात अनेकविध खेळ आणि बुद्धीला चालना देणार्‍या उपक्रमांच्या माध्यमातून आपले नेतृत्व कौशल्य दाखवले. खेळ आणि उपक्रम दिसायला जरी सोपे आणि आपण लहानपणी खेळलेलेच होते पण त्यादिवशी खरंच वरून सोप्या वाटणार्‍या खेळांमध्ये सामाजिक क्षेत्रात वावरतानालागणारे गुण कसे निखरतात हे उलगडत होते. त्यानंतर द्वितीय भागातील चर्चासत्राचा कार्यक्रम हा तरुणाईचे अंतरंग उलगडणारे संभाषणच होते.
 
कारण, चर्चासत्राचे विषयच समाज आणि विशेषतः तरुणाईच्या जीवनाशी संबंधित होते. ते विषय असे- माझ्या जगण्यातील संविधान, शीख असंघटित व्हा आणि संघर्ष करा, शिक्षण आणि आम्ही, माझी वस्ती माझी जबाबदारी, सामाजिक कार्यकर्त्याची शारीरिक आणि मानसिक सिद्धता. तर या विषयांवर आठ गटांमध्ये सखोल चर्च तर झालीच पण चर्चेचे बिंदू सहभागीच्या मनावर रुजले. त्याचे प्रत्यंंतर पुढे त्यांनी जेव्हा चर्चेचे बिंदू मांडले तेव्हा दिसून आले. सहभागी तरुणाईच्या चर्चेमध्ये सुसंगत तर्क, सहजसुदंर पद्धती आणि विषयांचे ज्ञान यांचा आपसूकच ठसा उमटला गेला.

तिसरे सत्र पुस्तक परिचयाचे होते. तृतीय सरसंघचालक प.पु. बाळासाहेब देवरसजीं यांनी १९७४ च्या पुणे येथील ’वसंत व्यख्यानमालेत अत्ंयत मौलिक उद्बोधक भाषण केले होते. त्या उद्बोधनाचे पुस्तक प्रकाशित झाले. ‘सामाजिक समरसता आणि हिंदू संघटन’ या नावाचे ते पुस्तक समाजासाठी अत्यंत मैलाचा दगड ठरले. त्या पुस्तकाचा परिचय रवी नलवडे यांनी उपस्थितांना करून दिला. रवी यांनी पुस्तकातील आशय अत्यंत रसाळ आणि तितक्याच सहजपणे सांगितला. पुस्तकाचे सार विविध उदाहरण देऊन त्यांनी स्पष्ट केला. उपस्थित तरुणाई पुस्तकातील विचारांनी भारावून गेलेली दिसली. नाही भारवून गेली असे म्हणणे म्हणजे अर्धसत्यच होईल. खरे तर उपस्थित तरुण पुस्तकातील आशय विचारांनी समाजाचे वास्तव समाजासमोरील प्रश्न आणि आपण समाजाचे घटक म्हणून काय विचार कार्य करू शकतो याबद्दल सजग झाली. १९७४ साली बाळासाहेब देवरसजींनी सांगितलेले सामाजिक समरसतेचे विचार आजच्या सामाजिक जीवनालाही तंतोतंत लागू पडत होते. अस्पृश्यता आणि आरक्षणावर मांडलेले त्यांचे विचार त्यांचा द्रष्टेपणा दर्शवित होता. या अत्ंयत महत्त्वपूर्ण सत्रानंतर खर्‍या अर्थाने तरुणाईसाठीच असलेल्या उद्बोधनाचे समारोप सत्र सुरू झाले.
 
समारोप सत्रात रा.स्व.संघ कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांचे उद्बोधन होते. पालकांनी आपल्या लेकरांशी त्याच्या पुढील आयुष्याच्या सकारात्मक प्रगतीसाठी अत्यंत मायेने आणि निस्वार्थीभावाने बोलावे तसे विठ्ठलरावांचे मार्गदर्शन होते.
विठ्ठल कांबळे यांचे उद्बोधन म्हणजे एका प्रगल्भ सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि समाज अभ्यासकाचे तरुणाईला सकारात्मकरित्या प्रबोधन करणारा एक निखळ निर्मळ सवांदच होता. विठ्ठल कांबळे यांनी मार्गदर्शनाद्वारे तरुणाईला स्वतःबद्दल, समाजाबद्दल आणि देशाबद्दल विचार करायला भाग पाडले. तरुण म्हणून आपली जबाबदारी काय? समाज आणि देश घडवताना आपली भूमिका किती महत्त्वाची हे त्यांनी अगदी सहजरित्या सांगितले. विठ्ठल कांबळे बोलत होते आणि सगळी तरुणाई तल्लीन होऊन त्यांचे मनोगत एकत होती. यावेळी ‘देव देश प्रतिष्ठाण’, स्वयम महिला मंडळ, ‘दिशा ज्योत फाऊंडेशन’, जय भीम आर्मी, ‘वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट, क्रांती संघर्ष ट्रस्ट’ , ‘अंकुर प्रतिष्ठान’, ‘अधिष्ठान सामाजिक संस्था’, ‘सिद्धी महिला कल्याणकारी संस्था’, ‘सधम्म सामाजिक संस्था’ अशा अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ता उपस्थित हातेे.
 
आजची युवा पिढी ऐकतच नाही, जीवनाबद्दल गंभीरच नाही ही विधान या कार्यक्रमामध्ये पुसून गेली होती. कारण, चार तासांच्या या कार्यक्रमात जमलेली ही युवा पिढी अत्यंत सजगपणे आपली मत व्यक्त करत होती आणि समोरच्याची मत तितक्याच खिलाडूपणे स्वकारही करत होती. समाज आणि देश याविषयीची त्यांची आत्मियताही यावेळी दिसून आली.
 
डॉ. रवींद्र कांबळे
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.