‘आकृतीबंध’ चित्रप्रदर्शन उदयापासून सुरू

    25-Nov-2024
Total Views |
  
आकृतीबंध
 
मुंबई : नवोदित चित्रकारांना त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ मिळावे आणि चित्रप्रेमींना चित्रांचा आस्वाद घेण्याची संधी मिळावी म्हणून आकृतीबंध हे चित्रप्रदर्शन ‘आर्ट एन्ट्रन्स गॅलरी, आर्मी नेवी बिल्डिंग, काला घोडा, जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोर, फोर्ट, मुंबई’ येथे आयोजित करण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अनुजा कानिटकर, अभिषेक राठोड, रोहित गायकवाड, तन्वी सागवेकर, ध्रुवा केलसकर आणि सिद्धांत चव्हाण या कलाकारांची चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनाला विशेष अतिथी म्हणून भारती पित्रे, अरुण आंबेरकर, डॉ. गोपाल नेने, विजयराज बोधनकर आणि आनंद महाजनी इत्यादी दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत.