'वक्फ हटाओ, अन्नदाता बचाओ'; कर्नाटकात हिंदू संत, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

    22-Nov-2024
Total Views | 71

Waqf Hatao, Annadata Bachao

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Waqf Hatao, Annadata Bachao)
कर्नाटकसह देशभरातील मालमत्तेवर वक्फ बोर्ड ज्या वेगाने मनमानीपणे दावा करत आहे, त्याविरोधात लोक आता रस्त्यावर उतरू लागले आहेत. कर्नाटकच्या कलबुर्गी भागात नेगीलयोगी स्वाभिमान वेदिकेच्या बॅनरखाली राज्यातील मठाधिपती, हिंदू संत, भाजपा नेते आणि शेतकरी समर्थक संघटनांच्या सदस्यांनी "वक्फ हटाओ, अन्नदाता वाचवा" अशी घोषणाबाजी करत तीन दिवसीय निषेध मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री बीझेड जमीर अहमद यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी केली.

हे वाचलंत का? : 'सनातन धर्म मंडळ' स्थापन करा; किन्नर समाजाच्या मागणीला जोर

मिळालेल्या माहितीनुसार, कलबुर्गी येथील नागेश्वर शाळेपासून निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांनी हातात ‘वक्फ हटाओ, अन्नदाता बचाओ’ अशा घोषणांचे फलक घेतले होते. आंदोलनादरम्यान संत सिद्धलिंग स्वामी यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री बीझेड जमीर अहमद यांच्यावर जातीयवाद पसरवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, राज्यभरातील मठ, मंदिरे आणि शेतकऱ्यांच्या जमिनींना नोटिसा बजावून मंत्र्यांनी जातीय विष पेरले आहे. त्यांची वागणूक एखाद्या मंत्र्यासारखी कमी आणि पाकिस्तानच्या एजंटसारखी जास्त आहे. वक्फ न्यायालये आयोजित करून अल्पसंख्याकांना खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सिद्धलिंग स्वामी यांनी केला.

सिद्धलिंग स्वामी यांनी नमूद केले की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एकदा म्हटले होते की 2047 पर्यंत भारत इस्लामिक राष्ट्र होईल, धार्मिक स्थळे आणि मठ, मंदिरे वक्फ मालमत्तेत रूपांतरित करण्याचा जमीर अहमदचा प्रयत्न हे या दिशेने पहिले पाऊल आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121