काँग्रेस मविआतून बाहेर येण्याच्या तयारीत!

मित्रपक्षांना विश्वासात न घेता ठाकरेंकडून एबी फॉर्मचे वाटप; नितेश राणेंचा हल्लाबोल

    26-Oct-2024
Total Views | 700
 
Congress
 
मुंबई : उद्धव ठाकरे कोणालाही विश्वासात न घेता एबी फॉर्म वाटत आहेत. त्यांनी काँग्रेसचे अस्तित्व संपवण्याचा विडा उचलल्यामुळे काँग्रेस लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर येण्याच्या तयारीत आहे, असे वक्तव्य भाजप नेते नितेश राणेंनी केले आहे. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मविआची पोलखोल केली.
 
नितेश राणे म्हणाले की, काँग्रेस आणि उबाठा गटातील वादावर संजय राऊत कितीही खोटे बोलले तरी महाविकास आघातून काँग्रेस बाहेर निघण्याच्या उंबरठ्यावर आहे. पुढच्या ४८ तासांत काँग्रेस निर्णायक भूमिका घेण्याच्या मार्गावर आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीतून काँग्रेस नेते राहूल गांधी उठून गेले. विदर्भ, मुंबई आणि कोकणातील जागांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. पुढच्या दोन दिवसांत काँग्रेस आपली भूमिका घेईल, असे त्यांनी राज्यातील नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे."
 
हे वाचलंत का? -  कसबा पेठेत हेमंत रासने तर जतमध्ये पडळकरांना संधी! भाजपची दुसरी यादी जाहीर
 
काँग्रेस लवकरच भूमिका जाहीर करणार!
 
"उद्धव ठाकरे कोणालाही विश्वासात न घेता एबी फॉर्म वाटत आहेत. या जागांवर अजून महाविकास आघाडीमध्ये निर्णय झालेला नाही. काँग्रेसला फाट्यावर मारण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा ९० टक्के काँग्रेसचा निर्णय झाला आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे अस्तित्व संपवण्याचा विडा उचलल्याने राहूल गांधींना प्रंचड राग आला आहे. त्यामुळे काँग्रेस लवकरच आपली भूमिका घेणार आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121