एकीकडे अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्या, दुसरीकडे अभिषेकने घेतले १० फ्लॅट

    25-Oct-2024
Total Views |
 
abhishek
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन गेल्या अनेक दिवसांपासून विशेष चर्चेत आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सगळीकडे सुरु असून दुसरीकडे अभिषेक बच्चन याने १-२ नव्हे तर चक्क १० फ्लॅट विकत घेतले आहेत. या त्याच्या गुंतवणूकीत अमिताभ बच्चन यांचाही सहभाग असून या दोघांनीही रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. बच्चन कुटुंबाची ही आलिशान मालमत्ता ओबेरॉय रिॲलिटी प्रोजेक्टमध्ये असून यात ३ बीएचके आणि ४ बीएचके अपार्टमेंट आहेत. त्यांनी असे एकूण १० अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत.
 
सध्या अभिषेक बच्चन त्याची पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय घटस्फोटाच्या बातम्यां चित्रपटवर्तृळात चर्चेत आहेत. याच दरम्यान, आता अभिषेकने वडिलांबरोबर मुंबईतील मुलुंड परिसरात नवीन आलिशान अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत. या मालमत्तेची किंमत २४.९५ कोटी इतकी आहे. स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या वृत्तानुसार, अभिषेक व अमिताभ यांनी मुंबईत आतापर्यंत जवळपास २१९ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे.
 
स्क्वेअर यार्ड्सवरील नोंदणी दस्तऐवजानुसार, अमिताभ व अभिषेक यांनी ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम निवासी प्रकल्प इटर्नियामध्ये १० अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत. यापैकी ८ अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ प्रत्येकी १,०४९ चौरस फूट आहे. तर, इतर दोन अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ ९१२ चौरस फूट प्रत्येकी आहेत. २५.९५ कोटी रुपयांत त्यांनी १०,२१६ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली मालमत्ता खरेदी केली आहे.
 
तसेच, अधिक माहितीनुसार, १० अपार्टमेंटपैकी ६ अभिषेक बच्चनने विकत घेतली आहेत. यासाठी त्याने १४.७७ कोटी रुपये मोजले असून इतर चार अपार्टमेंट्स अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली आहेत. या अपार्टमेंट्सची किंमत १०.१८ कोटी असून अमिताभ व अभिषेक यांनी १.५० कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी देखील भरली आहे.
 
तसेच, अभिषेकने काही महिन्यांपूर्वी जलसा बंगल्याजवळ मालमत्ता खरेदी केली होती. आणि त्यापूर्वी अभिषेक बच्चनने बोरिवलीत एकूण ६ नवे फ्लॅट्स विकत घेतले होते. आणि आता अभिषेकने ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये ६ फ्लॅट्स घेतले आहेत.